Priya More
झिका व्हायरस हा डासांमुळे पसरतोय. डासांच्या एडीज प्रजातीद्वारे तो पसरतो.
झिका व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना विषाणूची लागण होते. त्यानंतर ते डास इतर व्यक्तींना चावल्याने व्हायरस पसरतो.
झिका व्हायरस होऊ नये यासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
झिका व्हायरस मच्छरमुळे पसरतो. त्यामुळे घराभोवती स्वच्छता ठेवा जेणे करुन मच्छर होणार नाहीत.
झिका व्हायरस होऊ नये यासाठी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवू नका.
झिका व्हायरस होऊ नये यासाठी तुमच्या घरातील टॉयलेटचे सीट झाकून ठेवा.
झिका व्हायरस होऊ नये यासाठी घराबाहेर पडताना आणि घरात असताना सुद्धा फूल स्लिव्हज कपडे घाला.
झिका व्हायरस झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका.
आपले हात साबणाने धुवा आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर कपडे बदला किंवा धुवा.