Communication in relationship SAAM TV
लाईफस्टाईल

Relationship Tips: या ४ कारणांमुळे तुमचं नातं तुटू शकतं; पार्टनरसमोर चुकूनही बोलू नका अशा गोष्टी

Communication in relationship: नातं मजबूत ठेवण्यासाठी योग्य संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो. काही शब्द रागात किंवा मस्करीत बोलले तरी ते नात्याला तडा देऊ शकतात. पार्टनरशी बोलताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेणं आवश्यक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नातं कोणतंही असो त्यामध्ये विश्वास आणि बोलणं महत्त्वाचं असतं. मात्र जितकं बोलणं गरजेचं आहे तसंच काही प्रमाणात काही गोष्टी बोलणं टाळलं देखील पाहिजे. कधीकधी, रागाच्या भरात किंवा मस्करीत बोललेल्या गोष्टी खूप दुखावू शकतात आणि नात्यात दुरावा निर्माण करू शकतात.

तुम्ही तुमच्या पार्टनरला कोणत्या गोष्टी कधीही बोलू नयेत हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या शिवाय एक मजबूत नातं टिकावायचं असेल तर कोणत्या शब्दांचा विचार करून वापर केला पाहिजे ते पाहूयात.

नात्याबद्दल पश्चात्ताप करणं

जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात तर नात्याबद्दल पश्चात्ताप होतोय असं कधीही म्हणू नका. रागाच्या भरात बोललेले हे शब्द समोरच्या व्यक्तीचं मन दुखावू शकतात. हे शब्द तुमचे नातेसंबंध कमकुवत करू शकतात. त्यामुळे वाद कितीही गंभीर असला तरी असे शब्द बोलणं टाळा.

पैशाबद्दल बोलणं

दुसरं म्हणजे तुमच्या पार्टनरच्या आर्थिक परिस्थितीवरून किंवा पैशांवरून त्यांना टोचून बोलणं चुकीचं आहे. पैशाच्या गोष्टी खूप वैयक्तिक असतात आणि त्यावर मस्करी केल्याने किंवा टोचून बोलल्याने समोरच्या व्यक्तीला निरुपयोगी किंवा कमीपणाची भावना येऊ शकते.

जवळच्या व्यक्तीबद्दल बोलणं

प्रत्येक व्यक्तीला त्याची जवळची माणसं प्रिय असतात. त्यामुळे चुकूनही त्यांच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल वाईट बोलणं योग्य नाही. कारण हे लोक त्यांच्यासाठी खास असतात आणि अशा बोलण्यामुळे तुमच्या नात्यातील तणाव वाढू शकतो.

कमतरतांची चेष्टा करणं

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमतरता असतात. या कमतरतांची कधीही चेष्टा करू नका. त्यांना कमकुवत करणाऱ्या गोष्टींवर थट्टा केल्याने वाईट वाटू शकतं. प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं आणि आधार देणं. त्यामुळे अशा परिस्थितीत समोरच्या व्यक्तींच्या उणिवांचा शस्त्र म्हणून वापर करणं योग्य नव्हे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी 1063 कोटी मंजूर; कोणती कामे होणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये जनावरांच्या गोट्याला भीषण आग, सात जनावरांसह शेती उपयोगी साहित्य जळून खाक

नेपाळने वाढवलं भारतीय व्यावसायिकांचं टेन्शन; सरकारने घेतला मोठा निर्णय

Aamchya Pidhichi Goshta Vegli: आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!' तीन पिढ्यांचा क्रेझी प्रवास; लवकरच रंगभूमीवर

पुण्यात धक्कादायक घटना! हात बांधलेले अन् मृतदेह झाडाला लटकलेला; लष्कराच्या जवानासोबत नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT