Difference between stress and anxiety saam tv
लाईफस्टाईल

Mental Health: हृदयाचे ठोके वाढतात, झोप उडते; पण Stress आणि Anxiety यामध्ये नेमका फरक काय?

Difference between stress and anxiety: तणाव आणि चिंता हे शब्द अनेकदा समान मानले जातात, मात्र दोन्हींची कारणे आणि परिणाम वेगळे असतात. तज्ज्ञांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या फरकांमुळे मानसिक आरोग्य समजून घेणे सोपे होते आणि योग्य वेळी मदत घेण्यास मदत मिळते.

Surabhi Jayashree Jagdish

तणाव आणि चिंता यामधला फरक समजून घेणं आजच्या काळात खूप महत्त्वाचं बनलंय. अनेकदा लोक 'मला खूप स्ट्रेस आहे' आणि 'माझी चिंता वाढली आहे' हे शब्द एकाच अर्थाने वापरतात. मात्र मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या दोन्ही भावना दिसायला सारख्या वाटल्या तरी त्यामागची कारणं आणि परिणाम वेगळे असतात.

तणाव आणि चिंता दोन्ही वेगळ्या बाबी

तणाव आणि चिंता या दोन्ही अवस्थांमध्ये हृदयाचे ठोके वाढणं, Stomach discomfort जाणवणं किंवा झोप न लागणं यांसारखी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे अनेकांना त्या एकाच गोष्टीसारख्या वाटतात. पण प्रत्यक्षात तणाव हा सध्याच्या परिस्थितीशी संबंधित असतो तर चिंता भविष्यात काय होईल याच्या विचारांमधून निर्माण होते.

तणाव म्हणजे काय?

नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पार्थ नागडा यांनी सांगितलं की, तणावाची सुरुवात बहुतेक वेळा एखाद्या बाह्य कारणामुळे होते. आपल्या आयुष्यात अचानक उभं राहिलेलं आव्हान किंवा दबाव यामुळे तणाव निर्माण होतो.

तणावाची कारणं

कामाची जवळ आलेली डेडलाईन, जोडीदारासोबत झालेला वाद, ट्रॅफिकमध्ये अडकणं किंवा अचानक आलेली आर्थिक अडचण यांसारख्या घटना तणाव निर्माण करू शकतात. अशा परिस्थितींना शरीर आणि मन नैसर्गिक प्रतिक्रिया देतात.

तणाव किती काळ टिकतो?

तणावाची एक मर्यादित कालावधी असतो. काम पूर्ण झाल्यावर, वाद मिटल्यावर किंवा समस्या सुटल्यावर तणाव हळूहळू कमी होतो आणि शरीर पुन्हा सामान्य स्थितीत येते.

तणावाचा सकारात्मक पैलू

सामान्य प्रमाणातील तणाव काही वेळा फायदेशीरही ठरतो. तो शरीरात ऊर्जा आणि एकाग्रता वाढवतो. त्यामुळे एखादं महत्त्वाचं काम वेळेत पूर्ण करण्यासाठी किंवा आव्हानाचा सामना करण्यासाठी मदत मिळू शकते.

चिंता म्हणजे ‘काय होईल?’ या विचारांची साखळी

चिंता ही बाह्य परिस्थितीपेक्षा मनातील विचारांमधून निर्माण होते. सध्या काय घडत आहे यापेक्षा पुढे काय घडू शकते याची काळजी चिंता वाढवते.

चिंतेची कारणं

चिंतेमागे नेहमी एखादं स्पष्ट कारण असेलच असं नाही. अनेकदा ती अस्पष्ट भीती, सततची काळजी किंवा अनिश्चिततेमुळे निर्माण होते. एखादी गोष्ट बिघडेल का, काही वाईट घडेल का अशा विचारांनी मन व्यापून जाते.

चिंता किती काळ टिकते?

चिंता एखादी समस्या संपल्यानंतरही संपत नाही. एक काळजी दूर झाली की दुसरी नवीन चिंता मनात निर्माण होते. त्यामुळे ती दीर्घकाळ टिकू शकते.

चिंतेची भावना कशी असते?

तणावामुळे माणूस गोंधळलेला किंवा त्रस्त वाटू शकतो. पण चिंतेमुळे तो असहाय्य किंवा अडकून पडल्यासारखा अनुभव घेऊ शकतो. चिंता अनेकदा मेंदूला सर्वात वाईट शक्यतांचा विचार करण्यास भाग पाडते, जरी त्या प्रत्यक्षात घडण्याची शक्यता कमी असली तरी.

‘फॉल्स अलार्म’चा परिणाम

तज्ज्ञांच्या मते, शरीराची संरक्षण यंत्रणा घरातील स्मोक डिटेक्टरसारखी असते. तणाव म्हणजे स्वयंपाकघरात खरोखर धूर झाल्यावर वाजणारा अलार्म. तो धोक्याची सूचना देतो आणि योग्य कृती करण्यास मदत करतो. मात्र चिंता म्हणजे रात्री कोणताही धूर नसताना अचानक वाजणारा अलार्म. अशा वेळी शरीराला खऱ्या धोक्याची जाणीव होत नसतानाही हृदयाचे ठोके वाढतात, श्वासोच्छ्वास वेगवान होतो आणि भीतीची भावना निर्माण होते.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल?

सामान्य तणाव हा जीवनाचा एक भाग मानला जातो. मात्र जर चिंता वास्तव परिस्थितीपेक्षा खूप जास्त वाटू लागली, सतत भीतीची भावना राहू लागली किंवा झोप, कामकाज आणि नातेसंबंधांवर त्याचा परिणाम होऊ लागला, तर ती चिंताजन्य विकाराची लक्षणं असू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT