Home Remedies For Beard 
लाईफस्टाईल

Beard Growth: दाढी वाढत नाहीये का? 'हे' घरगुती उपाय करुन तुमचा लूक बनवा स्टायलिश

Home Remedies For Beard: जर तुम्हाला घनदाट आणि जाड दाढी पाहिजे असेल तर काळजी करू नका. काही सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही देखणे दाढी मिळवू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल मुलांमध्ये दाढी ठेवण्याची खूप क्रेझ आहे कारण दाढीमुळे त्यांचा लूक स्टायलिश आणि क्लासी दिसतो. त्यामुळे मुले नियमितपणे सलूनमध्ये जाऊन दाढीची खास स्टाइल बनवतात. मात्र, काहींना काळजी वाटते की त्यांची दाढी जाड नाहीये. अशा मुलांसाठी काही सोप्या आणि प्रभावी टिप्स आहेत ज्यांच्या मदतीने दाढी जाड आणि घनदाट दिसू शकते. यामुळे त्यांचा लूक आणखी आकर्षक बनेल.

या टिप्स केमिकलशिवाय दाढी वाढवण्यासाठी प्रभावी आहेत. त्यांचा वापर करून तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाही आणि कठोर मेहनतही करावी लागणार नाही. त्यामुळे आता उशीर न करता या सोप्या आणि नैसर्गिक उपायांची मदत घ्या. आम्ही तुम्हाला या उपायांपैकी एका खास टिप्सबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.

कृती

दाढी येण्यासाठी लिंबाचा रस आणि तेल एकत्र करून चांगले मिसळा, ही पद्धत अतिशय सोपी आहे.

मिश्रण दाढीवर हलक्या हातांनी लावा, किमान १५ मिनिटे ठेवा, नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

ही पेस्ट आठवड्यात तीनदा वापरा. काही दिवसांत तुम्हाला चेहऱ्यावर दाढी वाढत चालल्याचे दिसेल आणि परिणाम दिसून येतील.

जर तुम्ही ही पेस्ट नियमित वापरली तर काही दिवसांत परिणाम दिसतील. लिंबातील व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचा आणि केसांना पोषण देतात.

खबरदारी घ्या

ही पेस्ट वापरण्याआधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे, कारण लिंबामधील आम्लामुळे त्वचेवर ऍलर्जी होऊ शकते. पेस्ट लावल्यानंतर थेट उन्हात जाणे टाळा, अन्यथा त्वचा जळू शकते. काळजीपूर्वक वापरा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT