
आजकाल खराब आहार आणि जीवनशैलीमुळे किडनीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. किडनी शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करते आणि द्रव संतुलन राखते. जर किडनी ठीक नसेल तर संपूर्ण आरोग्यावर वाईट परिणाम होतो. म्हणून किडनीसाठी निरोगी आहार घेणे खूप गरजेचे आहे. किडनीसाठी फायदेशीर असलेल्या काही पदार्थांची माहिती दिली आहे. चला, त्या पदार्थांबद्दल जाणून घेऊया.
औषधी वनस्पती
ओरेगॅनो, पार्सली आणि कोथिंबीर अशा औषधी वनस्पती केवळ अन्नाला स्वादिष्ट बनवत नाहीत, तर किडनीसाठीही फायदेशीर आहेत. या वनस्पतींमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स असल्याने शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स दूर करतात आणि किडनीचे रक्षण करतात. त्यामुळे आहारात या वनस्पतींचा समावेश आवश्यक आहे.
बीट
बीट किडनीसाठी उपयुक्त सुपरफूड आहे. त्यातील नायट्रेट्स रक्तदाब कमी करतात, ज्यामुळे किडनीचे रक्षण होते. बीटमध्ये फायबर, फोलेट आणि व्हिटॅमिन-सीही असून, बीटालेन अँटी-ऑक्सिडंट म्हणून किडनीला ऑक्सिडेटिव्ह ताणापासून बचाव करतो. त्यामुळे आहारात बीटचा समावेश गरजेचा आहे.
ब्लूबेरी
ब्लूबेरी किडनीसाठी फायदेशीर आहे कारण त्यात कमी पोटॅशियम आणि जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात. किडनी आजारी लोकांसाठी ब्लूबेरी उत्तम पर्याय आहे. त्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँथोसायनिन असतात, जे पचन सुधारतात आणि मूत्रपिंडांचे संरक्षण करतात.
मॅकाडामिया नट्स
मॅकाडामिया नट्समध्ये कमी फॉस्फरस आणि भरपूर निरोगी चरबी असते, जी मूत्रपिंडासाठी लाभदायक आहे. त्यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स हृदयासाठी चांगले असतात. प्रथिने आणि फायबरमुळे ऊर्जा मिळते. दररोज मूठभर मॅकाडामिया नट्स खाल्ल्याने मूत्रपिंड निरोगी राहतात.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.