Youth health risks due to bad lifestyle habits google
लाईफस्टाईल

Health Risks: तरुणांनो सावध व्हा! 'या' ४ वाईट सवयींमुळे होतील जीवघेणे आजार, वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Lifestyle Diseases: आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये कॅन्सर, हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका.

Sakshi Sunil Jadhav

तरुण मुलं- मुली ही खूप फीट असतात, असं म्हंटलं जातं. या वयात तरुणमंडळी दिवसरात्र मेहनत करत असतात आणि त्यांचं शरीर त्यांना उत्तम प्रमारे साध देत असतं. पण सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कमी वयातच जीवघेण्या आजारांना सामोरं जावं लागतं. पुढील लेखात आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सध्याच्या तरुणांमध्ये फॅटी लिव्हर, किडनी डॅमेज, हार्ट अटॅक आणि कॅन्सरसारखे आजार वाढताना दिसत आहेत, यामागे त्यांची चुकीची जीवनशैली हेच मुख्य कारण असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

हैदराबादमधील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. साद्विक रघुराम वाय यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये 20 व्या वर्षातील मुलांच्या काही सवयींनी भविष्यात कॅन्सरचा धोका वाढवू शकतो असा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, प्रत्येकाला वाटत असतं की, आपण हेल्दी, फीट आहोत पण शरीरातल्या पेशींच्या हालचालींबाबत त्यांना माहिती नसते.

तज्ज्ञ सांगतात की अनेक दिवसांची अपुरी झोप घेणं ही एक सगळ्यात धोकादायक सवय आहे. उशिरापर्यंत जागरण करणं आणि अपूर्ण झोप घेतल्याने शरीराची जैविक घड्याळ बिघडतं. बरेच दिवस झोप पूर्ण न झाल्यास पेशींना स्वतःची दुरुस्ती करण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

आजच्या धावपळीत जंक आणि प्रोसेस्ड फूड खाणं वाढलंय. ही एक टेन्शनची बाब आहे. पॅकेटमधले, तळलेल्या आणि फास्ट फूडमध्ये पौष्टिक घटक कमी आणि रसायनं जास्त असतात. अशा अन्नामुळे शरीरात सूज वाढते, पचनसंस्था बिघडते आणि कालांतराने हे बदल कॅन्सरसारख्या गंभीर आजारांशी जोडले जाऊ शकतात.

डेस्क जॉब करणाऱ्या तरुणांमध्ये सतत तासनतास बसून राहण्याची सवय वाढली आहे. शरीराला हालचाल न मिळाल्यास कोलन आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रत्येक तासाला थोडं चालणं-फिरणं आरोग्यासाठी आवश्यक आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest Blouse Designs: साडीत हॉट आणि ग्लॅमरस दिसायचय? डिप नेक ब्लाऊजच्या या 5 लेटेस्ट डिझाईन नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांच्या मुलीकडूनही उमेदवारी अर्ज दाखल

Train Accident: भयंकर! ट्रेनचे डबे रूळावरून घसरून दरीत कोसळले, १३ प्रवाशांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Aadhaar-PAN Link: आधार-पॅन कार्ड लिंक केलंय? पण खरंच झालंय का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

कल्याण-डोंबिवलीत एकनाथ शिंदेंना धक्का! २० वर्षे शिवसेनेशी निष्ठा असलेला कार्यकर्ता म्हणतो, माझी हकालपट्टी करा!

SCROLL FOR NEXT