Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्यांच्या मते, आयुष्यात काही विशिष्ट टप्पे असे असतात जिथे मेहनतीपासून दूर पळणारा माणूस पुढे फक्त अपयश, संघर्ष आणि पश्चात्तापालाच सामोरा जातो. चाणक्य नीतीनुसार योग्य वेळी केलेली मेहनतच यशाची गुरुकिल्ली ठरते.
चाणक्य सांगतात की बालपण आणि शिक्षणाचा काळ हा ज्ञान, संस्कार आणि शिस्त शिकतण्यासाठीचा सगळ्यात चांगला काळ असतो.
बालपणी अभ्यास आणि शिस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना मग आयुष्यात खूप मेहनत करावी लागते. पुन्हा सुरुवातीपासून गोष्टी शिकाव्या लागतात.
शिक्षण आणि ज्ञान नसेल असल्यास आयुष्यात येणाऱ्या चांगल्या संधी गमावल्या जातात.
तरुणपणात शरीरात ऊर्जा, आत्मविश्वास आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असते. त्यामुळे या काळात आळस करणं टाळलं पाहिजे.
तरुणपणात वेळ वाया घालवणारा व्यक्ती पुढे कमकुवत आणि अपयशी ठरतो, असं चाणक्य म्हणतात.
योग्य वेळी मेहनत म्हणजे भविष्याची मजबूत पायाभरणी असते. तरुणपणी केलेली मेहनत आयुष्यतल्या यशाची दिशा ठरवते.
नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणातील संधी टाळल्यास पुढे स्वतःलाच दोष द्याल. त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करा.
संकटांच्या काळात धैर्याने मेहनत करणारा माणूसच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.