Yoga For Good Sleep Saam TV
लाईफस्टाईल

Yoga For Good Sleep : डोळे मिटले तरी रात्रभर झोप लागत नाही? मग आजपासूनच 'ही' योगासने ट्राय करा

Good Sleep Tips : झोप पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही आज तुम्हाला काही योगासने सांगणार आहोत. त्याने तुम्हाला रात्री छान झोप लागेल.

Ruchika Jadhav

आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी सकस आणि उत्तम आहारासह आपल्याला पुरेशी झोप मिळणे देखील गरजेचे आहे. मात्र अनेक व्यक्ती रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. कामासाठी लवकर उठावे लागत असल्याने अशा व्यक्तींच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो.

झोप पूर्ण न झाल्याने पोट साफ होत नाही. दिवसभर डोकं दुखतं, पोटही दुखतं, कामात लक्ष लागत नाही, आळस जास्त वाढतो. आता या सर्वांतून वाचण्यासाठी झोप पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही आज तुम्हाला काही योगासने सांगणार आहोत. त्याने तुम्हाला रात्री छान झोप लागेल.

लेग अप द वॉल पोज

लेग अप द वॉल पोज (Legs Up the Wall Pose) हे आसन फार सोप्प आहे. त्यासाठी आधी भींतीजवळ झोपा. त्यानंतर भिंतीचा आधार घेत तुमचे दोन्ही पाय हळूहळू भींतीला चिटकवत वर करा. असे केल्याने तुमचे ब्लड सर्क्युलेशन छान होईल आणि तुम्हाला सुखाची झोप लागेल.

शवासन

हे आसन झोपण्याआधी करावं. यासाठी तुम्हाला एखादं शव असं ठेवलं जातं तसं झोपायचं आहे. अगदी शांत आणि रिलॅक्स होऊन जमिनीवर झोपा. तसेच आपल्या दिर्घ श्वासाकडे लक्ष द्या. यावेळी मनात अन्य कोणतेही विचार येऊ देऊ नका.

सुप्त बुध्द कोणासन

हे आसन करताना आधी जमिनीवर पालथं झोपा. पोट खाली आणि दोन्ही हात देखील खाली मागच्या बाजूला दुमडून ठेवा. त्यानंतर हळूहळू छातीचा भाव वर उचला. हे करताना तुमचे पोट बरती उचलले जाणार नाही याची जास्त काळजी घ्या.

बालासन

झोप छान लागावी यासाठी मेंदूला रक्त पुरवठा होणे गरजेचं असतं. त्यासाठी बालासन गरजेचं आहे. आधी एका उंच जागेवर किंवा घरातील बेटवर आडवे झोपा. त्यानंतर केस मोकळे सोडून हे केस आणि डोकं मानेपर्यंत बेड खाली हवेत तरंगू द्या. झोपलेले असल्याने तुम्ही खाली बडणार नाही. हे आसन केल्याने तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

SCROLL FOR NEXT