Yoga For Asthma: दम्यावर रामबाण उपाय सापडला;विरासन केल्याने घेता येईल मोकळा श्वास

Yoga For Health: बदलत्या जीवनशैलीमुळे लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. मात्र अनेकदा या ताणतणांवामुळे व्यक्तीच्या शारिरीक आरोग्याचे नुकसान होते,
Yoga For Health
Yoga For AsthmaCanva

बदलत्या जीवनशैलीमुळे लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. मात्र अनेकदा या ताणतणांवामुळे व्यक्तीच्या शारिरीक आरोग्याचे नुकसान होते,अनेक व्याधी व्यक्तीला जोडल्या जातात,त्यातीस एक समस्या म्हणजे दम्याचा त्रास. अनेक व्याधींना योग्य करण्यासाठी अनेक व्यक्ती महागडे औषधे खात असतो मात्र त्यासोबतच त्यांनी काही योगासनेही केली पाहीजेत. दम्याची समस्या असलेल्या व्यक्तींनी विरासन आसन करणे फायदेशीर ठरते.

Yoga For Health
Lifestyle To Prevent Cancer: कर्करोग टाळाण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' छोटे बदल

विरासन हे योगामधील एक मुलभूत असे आसन आहे. ज्या व्यक्तींना दम्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी विरासन करणे हे अत्यंत फायदेशीर ठरते. विरासनास 'हिरो पोज' म्हणून देखील ओळखले जाते. योगा केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात शिवाय अनेक आजारांपासून दूर ठेवतो.

मात्र ज्या लोकांना दम्याचा त्रास होतो,त्यांच्यासाठी विरासन करणे हे अत्यंत फायदेशीर ठरते. नियमित विरासन केल्यान दम्याच्या त्रासापासून सुटका मिळू शकते. विरासन केल्याने मणक्या संबंधित आजार, पाय तसेच गुडघे यांना मजबूत करते. विरासन या आसनामुळे पचनक्रिया (digestion) योग्य राहण्यास मदत होते. मात्र जर तुमच्या गुडघ्याला काही दुखापत झाली असेल आणि तुम्हाला त्याचा त्रास होत असल्यास शक्यतो विरासन करणे टाळावे.

विरासन योगा केल्याने काय होते?

1. मणक्याचे आजार- नियमित विरासन हे आसन केल्याने पाठीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.

2. गुडघे आणि घोटे मजबूत करते - विरासन हे आसन पायावर बसून केले जाते,त्यामुळे पायांवर थोडा ताण येतो, आणि गुडघे आणि घोटे हे नियमित आसनामुळे अधिक मजबूत करण्यास मदत करते.

3. पचनक्रिया सुधारते : पोटाचे जे विकार आहेत ते विरासन हे आसन केल्याने दूर होण्यास मदत होते.

विरासन आसन कसं करायचं?

1. सर्वात आधी जमिनीवर तुमचे दोन्ही गुडघे एकत्र करुन,गुडघ्याच्या टाचांवर बसावे.

2. जर तुम्हाला बराच वेळ गुडघ्यावर बसायला त्रास होत असेल तर,तुम्ही आधारासाठी उशी पायाखाली घेऊ शकता.

3. आपले दोन्ही हात आपल्या मांड्यांवर आणि तळवे खाली तोंडावर ठेवावे.

4. नंतर ताट बसून एका ठिकाणी लक्ष केंद्रित करु श्वासोच्छासाठी बसा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Yoga For Health
Healthy Lifestyle: रात्री उशीरा जेवल्याने आरोग्य सुधारतं की बिघडतं? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com