Yamaha FZ S FI Saam Tv
लाईफस्टाईल

Smart Bike: 45 चा जबरदस्त मायलेज, 13 लिटर इंधन टाकी Yamaha ची स्मार्ट बाईक FZ S FI; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Powerful Bike : प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा तिच्या बाईक्समधील आकर्षक फ्रंट लाइट आणि स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. यातच यामाहाकडे FZ S FI ही हायस्पीड बाईक आहे.

Satish Kengar

Yamaha FZ S FI :

प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा तिच्या बाईक्समधील आकर्षक फ्रंट लाइट आणि स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. यातच यामाहाकडे FZ S FI ही हायस्पीड बाईक आहे. ही बाईक ताशी 115 किमीचा टॉप स्पीड देते. बाईकमध्ये 149 cc चे पॉवरफुल इंजिन आहे.

कंपनीचा दावा आहे की, ही बाईक रस्त्यावर 45 kmpl पर्यंत मायलेज देते. बाईकची सीटची उंची 790 मिमी आहे, ज्यामुळे सर्व उंचीचे लोक ती सहजपणे चालवू शकतात.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंजिन

FZS-Fi तीन रंग पर्यायांमध्ये येतो. Yamaha FZ S FI मध्ये 149 cc चे पॉवरफुल इंजिन आहे. बाईकमध्ये सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे 7250 rpm वर 12.2 bhp ची पॉवर आणि 5500 rpm वर 13.3 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यामाहा बाईक 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये देण्यात आली आहे. याचे वजन 135 किलो आहे. ही एक स्ट्रीट बाईक आहे, ज्यामध्ये तीन रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. (Latest Marathi News)

किती आहे किंमत?

Yamaha FZ S FI ची एक्स-शोरूम किंमत 1.21 लाख रुपये आहे. बाईकचे दोन प्रकार आणि 13 लीटरची मोठी इंधन टाकी आहे, ज्यामुळे लांबच्या प्रवासात वारंवार पेट्रोल भरण्याचे टेन्शन येत नाही. या बाईकमध्ये आकर्षक ड्युअल टोन सीट आहे. ही बाईक एलईडी टेललाइटसह येते. ही एक हाय एंड बाईक आहे, जी जबरदस्त ग्राउंड क्लीयरन्ससह येते.

यामाहाच्या या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. स्टँडर्ड आणि डीएलएक्स या दोन व्हेरियंटमध्ये ही बाईक सादर केली जात आहे. या बाईकच्या पुढच्या टायरवर टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन आहे, ज्यामुळे बाईक खडबडीत रस्त्यांवर सहज प्रवास करते. कंपनीमध्ये मल्टी फंक्शन एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यात सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आहे. बाईकला पुढील आणि मागील दोन्ही टायरवर डिस्क ब्रेकचे संरक्षण मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

SCROLL FOR NEXT