World TB Day 2023
World TB Day 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

World TB Day 2023 : स्पर्श केल्यानेही टीबी होतो ? जाणून घ्या, याबाबतचे समज-गैरसमज

कोमल दामुद्रे

World Tuberculosis Day : दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन हा 24 मार्च रोजी साजरा केला जातो. या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्याचा उद्देश नेहमी असतो.

क्षयरोग हा एक गंभीर आजार (Disease) आहे, जो सामान्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो. हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे, ज्यावर वेळीच उपचार न केल्यास गंभीर स्वरूप धारण करू शकते.

रक्तच्या थुंकीसह खोकला, ताप, रात्री घाम येणे, वजन कमी होणे अशी लक्षणे टीबीमध्ये दिसून येतात. गंभीर स्थितीत, हा रोग फुफ्फुसाव्यतिरिक्त शरीराच्या इतर भागांना देखील हानी पोहचवू शकतो.

गेल्या अनेक वर्षांपासून हा आजार भारतात (India) चिंतेचा विषय बनला आहे. सध्या तरी या आजारावर उपचार शक्य आहेत, परंतु असे असतानाही या आजाराशी संबंधित अनेक समज आणि गैरसमज आजही लोकांमध्ये पसरत आहेत. अशा परिस्थितीत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज आपण या आजाराशी संबंधित काही सामान्य समज आणि त्यांचे सत्य जाणून घेणार आहोत-

1. टीबी स्पर्शाने पसरतो

क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे, जो संक्रमित व्यक्तीला स्पर्श केल्याने पसरतो असे अनेक लोक मानतात. पण हे अजिबात खरे नाही. जेव्हा संक्रमित व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे (Symptoms) दिसून येतात तेव्हाच कोणतीही संक्रमित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस संक्रमित करू शकते. याशिवाय क्षयरोगाचा संसर्ग तेव्हाच पसरतो जेव्हा बॅक्टेरिया फुफ्फुसात किंवा घशात असतो. जर बॅक्टेरिया शरीराच्या दुसऱ्या भागात असेल, जसे की मूत्रपिंड किंवा मणक्यामध्ये, ते दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित करू शकत नाही.

2. टीबी हा अनुवांशिक आजार आहे

आजही टीबी हा अनुवांशिक आजार आहे असे मानणारे बरेच लोक आहेत. मात्र, सत्य काही वेगळे आहे. एकाच घरात राहणाऱ्या लोकांना हा आजार अनेकदा होतो, त्यामुळे लोक याला अनुवांशिक आजार समजू लागले. पण प्रत्यक्षात एकत्र राहणाऱ्या लोकांना हा आजार जीवाणूंच्या प्रसारामुळे होतो.

3. टीबी असाध्य आहे

हे पूर्णपणे चुकीचे आहे. टीबी हा असाध्य आजार नाही. त्याचे उपचार पूर्णपणे शक्य आहे. या आजारावर वेळीच उपचार केले तर तो बरा होऊ शकतो. क्षयरोगाचा उपचार 6 ते 9 महिन्यांचा असू शकतो.

4. टीबी प्राणघातक आहे

टीबी हा नक्कीच एक गंभीर आजार आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की तो जीवघेणा नाही. यावर योग्य वेळी आणि वेळेवर उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो.

5. टीबी फक्त फुफ्फुसांवर परिणाम करतो

लोकांना असे वाटते की, क्षयरोगाचा फक्त फुफ्फुसांवर परिणाम होतो, पण हे पूर्णपणे खोटे आहे. क्षयरोगाचा प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम होतो, परंतु रक्ताद्वारे हा रोग तुमच्या शरीराच्या इतर भागांवरही परिणाम करू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनाक्षी सिन्हाच्या 'हिरामंडी'ची चाहत्यांना भुरळ, अभिनयाची होतेय चर्चा

Today's Marathi News Live : मुंबईतील खार दांडा परिसरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमने-सामने

Delhi Metro: अगोदर बाचाबाची मग थेट हातच उचलला; मेट्रोमध्ये जोडप्याचं कडाक्याचं भांडण, VIDEO व्हायरल

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

Rohit Pawar News | अजित पवारच नाटकं करतात, रोहित पवारांचा घणाघात

SCROLL FOR NEXT