World Sleep Day 2024, How Can Meditation Help With Sleep Saam Tv
लाईफस्टाईल

World Sleep Day 2024 : अंथरुणावर पडताच क्षणी लागेल झोप, फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा

How Can Meditation Help With Sleep : शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर ती झोप. रात्री किमान ८ तासांची झोप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते. दिवसभर थकल्यानंतर रात्रीच्या वेळी आपल्याला शांत झोप लागणे महत्त्वाचे आहे.

कोमल दामुद्रे

Meditation For Better Sleep :

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर ती झोप. रात्री किमान ८ तासांची झोप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते. परंतु, कामाच्या व्यापामुळे, अधिकचा ताण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि कॅफीनचे अतिप्रमाणात सेवन यामुळे झोपेवर अधिक परिणाम होताना दिसून येत आहे.

दिवसभर थकल्यानंतर रात्रीच्या वेळी आपल्याला शांत झोप लागणे महत्त्वाचे आहे. परंतु, अनेकांना अंथरुणावर पडताच क्षणी झोप लागत नाही. वारंवार या कुशीवरुन त्या कुशीवर ते फिरत असतात. जर तुम्हालाही झोपेच्या समस्या सतावत असतील तर काही गोष्टींची काळजी (Care) घेणे गरजेचे आहे.

मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी ध्यान करणे अधिक चांगले ठरते. यामुळे तुम्ही आनंदी, तणावमुक्त राहाल तसेच इतर गोष्टींवर अधिक चांगल्याप्रकारे लक्ष केंद्रित कराल. यासाठी दररोज झोपण्यापूर्वी मेडिटेशन (meditation) करा यामुळे चांगली झोप लागेल.

झोपण्यापूर्वी या गोष्टी करा

1. श्वासोच्छवास मेडिटेशन

मेडिटेशन करण्यासाठी आपल्यला श्वासावर नियंत्रण ठेवा. हे करताना मनात येणारे विचार थांबवायला हवे. रात्री झोपण्यापूर्वी हे ध्यान केल्याने मन आणि शरीर दोघांनाही आराम मिळतो. त्यामुळे लगेच झोप येते.

2. बॉडी अवेअरनेस मेडिटेशन

बॉडी अवेअरनेस मेडिटेशनमध्ये तुम्हाला संपूर्ण शरीरावर लक्ष केंद्रित करावे लागेल. हे करण्यासाठी तुम्ही आरामात बेडवर झोपू किंवा बसू शकता. डोळे बंद करुन डोक्यात येणाऱ्या नकारात्मक विचारांना थांबवा. हळूहळू संपूर्ण शरीरावर लक्ष केंद्रित होईल. हे मेडिटेशन रोज केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

SCROLL FOR NEXT