First Aid after Dog Bite Saam TV
लाईफस्टाईल

First Aid after Dog Bite : तुम्हालाही कुत्रा चावलाय? रेबीज होण्याआधी घ्या ही काळजी

World Rabies Day :जागतिक रेबीज दिवस आहे. त्यामुळे रेबीज होऊ नये म्हणून काय केले पाहिजे याबद्दल जास्त माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

सध्या भटक्या कुत्र्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याने अनेक व्यक्ती जखमी होतात. कुत्र्याने चावा घेतल्यावर त्याच्या लाळेतील जंतू आपल्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे काही व्यक्तींना रेबीज सारख्या भयंकर रोगाचा सामनाही करावा लागतो. आज जागतिक रेबीज दिवस आहे. त्यामुळे रेबीज होऊ नये म्हणून काय केले पाहिजे याबद्दल जास्त माहिती जाणून घेणार आहोत.

कुत्रा चावल्यावर सर्वात आधी हे करा

कुत्रा चावल्यावर सर्वात आधी त्या जाखमेवर निर्जंतुक पट्टी बांधा. पट्टी बांधल्यानंतर जखमेवर स्वत:हून कोणताही मलम लावू नका. तातडीने जवळच्या रुग्णालयात धाव घ्या.

हा प्रथमोपचार अत्यंत महत्वाचा

कुत्रा चावल्यावर सर्वात आधी तुमचे हात स्वच्छ धुवा. त्यानंतर पाण्यासह हाताने जखम स्वच्छ करा. जखम स्वच्छ करताना किमान १५ मिनिटे तरी पाय स्वच्छ पाण्यात ठेवून धुवून घ्या. त्यानंतर पायाला पट्टी बांधून डॉक्टरांना दाखवा आणि योग्य तो उपचार करून घ्या.

पाळीव कुत्रा चावल्यावर रेबीज होतो का?

पाळीव कुत्रा आपण घेतो तेव्हा त्याची सर्व काळजी घेतली जाते. काही वेळा कुत्रा खेळताना आपल्याला त्याची नखे लागतात किंवा त्याचे दात लागतात. मात्र जर तुम्ही कुत्र्‍याला रेबीजची लस दिली असेल तर तुम्हाला त्याने रेबीज होणार नाही.

ही आहेत रेबीजची लक्षणे

शरीरातील स्नायूंमध्ये प्रचंड वेदना

ताप

डोकेदुखी

मानसिक संतुलन बिघडणे

कुत्रा चावू नये म्हणून ही काळजी घ्या

कुत्रा चावू नये म्हणून आपण स्वत: याची काळजी घेतली पाहिजे. पहिले म्हणजे कुत्र्यांच्या डोळ्यात पाहू नका. कुत्र्यांच्या डोळ्यांत पाहिल्यावर आपण त्यांना काही तरी खाण्यासाठी देणार आहोत असं त्यांना वाटतं आणि ते आपल्या मागे लागतात. कुत्र्यांच्या बाजून जाताने अजिबात घाबरू नका. आपण घाबरल्यावर कुत्र्‍यांना लगेचच समजतं. ही व्यक्ती काही तरी चुकीचं करत आहे असा विचार त्यांच्या डोक्यात येतो आणि ते आपल्यावर हल्ला करतात.

'कल्याण-डोंबिवलीत रेबीजमध्ये एकही मृत्यू नाही'

डोंबिवली, पलावा, शहाड, उल्हासनगर, विठ्ठलवाडी अंबरनाथ आणि बदलापूर येथे रेबीज प्रतिबंधक लसीकरण आयोजित करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी, पॉज, इनर व्हील क्लब डोंबिवली आणि वर्ल्ड वाईड वेटरनरी सर्व्हिस ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम 2 दिवस राबवला जात आहे. सुमारे 500 च्या वर भटक्या जनावरांना ही लस टोचन्यात येणार आहे. डॉ. अश्विन आणि पॉज संस्थेचे निलेश भणगे, विद्या चव्हाण यांनी हा कार्यक्रम तयार केला आहे.

यासाठी 11 कार्यकर्ते आणि 2 डॉक्टर स्वेच्छेने रेबीज लसीकरण मोहीम आणि ९ इन 1 ची लसीकरण मोहीम यशस्वी रित्या राबवणार आहेत. गेली 24 वर्षे पॉज संस्था रस्त्यावर उतरून भटक्या प्राण्यांचा साठी अविरत कार्य करत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरात एकही माणूस रेबीज मुळे मृत्युमुखी पडले नाही, असे निलेश भणगे यांनी सांगितले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT