प्रकाश आंबेडकरांकडून युतीबाबत सूचक विधान
काँग्रेस, शिंदे सेना व अजित पवारांशी चर्चा असल्याची कबुली
मुंबईत ५०-५० जागावाटपावर ठाम भूमिका
अकोल्यातील गटार योजनेवर संजय धोत्रेंवर आरोप
“विकास हवा की घाण?” असा अकोलेकरांना सवाल
अक्षय गवळी, अकोला
राज्यात प्रकाश आंबेडकर नेमकं कुणासोबत जाणार यावर सध्या मोठा सस्पेन्स आहे. एकीकडे मुंबई आणि नागपुरात आंबेडकर काँग्रेसशी आघाडी करणार असल्याच्या चर्चा आहे. तर दुसरीकडे आंबेडकरांनी राज्यात १२ ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि १० ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडीची चर्चा सुरू असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी एक सुचक आणि महत्वाचं विधान केलं. नवरदेव तयार आहे.. मुली पाहण्याचाही कार्यक्रम सुरू आहे.. नुसतं चहापाण्याच्या चर्चा आहेत. मुलगी पसंद आल्यानंतर लगीन लावू असं म्हणत त्यांनी अद्याप कुणाशीही युती-आघाडी झाली नसल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, आम्ही राज्यभर डेडलाईन देऊ शकत नाही, असं ते म्हणालेत. तर मुंबईचं सांगता येत नाहीये. कारण, आघाडी जाहीर करा म्हणलं तर थांबा म्हणतात.. आज काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र जात नाहीये. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यायचा आहे कुणासोबत जायचं. काँग्रेससोबत मुंबईत अद्याप जागा वाटपावर बोलणी सुरू झाली नाही.मात्र, ५० टक्के जागा वाटपांवर आम्ही ठाम असल्याचं ते म्हणाले. कारण, आम्ही नगरपालिकेत काय आहो, ते दिसलोय. दुसरीकडे आम्ही मूंबईत 200 जागांवर आमची तयारी आहे असं मोठं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. आमचा आग्रह ५०-५० टक्के जागांचा असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, अकोल्यातील भूमिगत गटार योजनेच्या फेल्युअरला माजी खासदार संजय धोत्रे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही योजना नको म्हणून संजय धोत्रेंनी केंद्राला पत्र लिहिलं होतं. त्यावेळी महापालिकेला आलेला ३५० कोटींचा निधी अजित पवारांनी बारामतीला पळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यावेळी अजित पवारांनी मला फोन करून सांगितलं, बारामतीकडं पैसे वळवले. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांचा संजय धोत्रेंवर मोठा आरोप केल्याने भाजप यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घाणीत राहायचे की विकास हवा, हे आता अकोलेकरांनी ठरवावे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. नागरिकांनी आता ठरवा की त्यांना घाणीत, अविकसित शहरात राहायचे आहे. विकासाच्या दिशेने जाणारे शहर हवे असेल तर वंचितला मतदान करा. घाणीत राहायचे असेल तर कमळाला मतदान करा, नाहीतर वंचितला साथ देत आमच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.