नगरपरिषद निकालानंतर अकोल्यात शिंदे सेनेत अंतर्गत वाद
महापालिकेच्या जागा वाटपावरून समर्थक आमने-सामने
मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत गोंधळ
शिंदे सेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर
अक्षय गवळी, अकोला
राज्यात काल नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल लागले. सर्वाधिक निकाल महायुतीच्या बाजूने पाहायला मिळाला. अकोल्यात मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन गटात वाद झाला. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले. हा वाद महापालिकेच्या जागा वाटपावरून झाला असल्याचे म्हटले जात आहे.
काल रात्री मंत्री संजय राठोड अकोल्यातल्या आरजे हॉटेलला मुक्कामी होते. याच ठिकाणी मंत्री राठोड यांच्या उपस्थित हा संपूर्ण वाद झाला. शिंदे सेनेतीलच काही पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यात सहा नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाला मोठ अपयश आलं आहे. केवळ ८ नगरसेवक शिंदे गटाचे निवडून आले.
ही नगरपालिका निवडणूक माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली होती. त्यामुळे आता अकोला महापालिका निवडणूक बाजोरिया यांच्या हाती न द्यावी, असा प्रस्ताव मंत्री राठोड यांच्यासमोर नवले गटाने ठेवला. याच दरम्यान जिल्हाप्रमुख अश्विन नवले आणि शिंदे गटाचे नेते बाजोरिया यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले. बाजोरीयांच्या समर्थकांकडून पॅक भरणारे माणसाच्या हातात महापालिका नको, असाही आग्रह मांडला गेला. अप्रत्यक्षपणे पिंजरकर यांना बाजोरीयांच्या यांच्या समर्थकांनी सुनावले. दरम्यान, पक्षातील हा संपूर्ण राडा मंत्री संजय राठोड यांच्यासमोर झाला होता. राठोड यांनी पदाधिकाऱ्यांना शांत केलंये. दोन्ही गटातील बाजू ऐकल्यानंतर वरिष्ठांकडे यासंदर्भात कळविण्यात येईल, असं आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिलं. त्यानंतर हा वाद शांत झाला.
दरम्यान अकोला महापालिका निवडणुकीत माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा हस्तक्षेप नको, महापालिका निवडणुकीत जागा वाटपाचा निर्णय पदाधिकाऱ्यांकडेच ठेवण्यात यावा, असा आग्रह नवले, पिंजरकर गटाकडून होता. तर पॅक भरण्याच्या हातात निवडणुक नको, अशा घोषणा बाजोरियांच्या समर्थकांनी लावल्या होत्या.
याच वेळी काहींनी खुर्च्या देखील एकमेकांवर उचलल्या होत्या. मात्र मंत्री राठोड यांनी हा वाद थोड्यावेळातचं मिटवला. महापालिकेच्या जागा वाटपावरून हा संपूर्ण वाद झाल्याचे बोलले जाते आहे. या वादानंतर मंत्री संजय राठोड अकोल्यातील पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर नाराज झाले होते. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याच्या चर्चा होत आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे शिवसेनेतील हा राडा कुठल्या स्तरावर जातो? आणि याचा परिणाम निवडणुकीवर काय होतो? हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.