ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात राणेंची तोफ धडाडणार? महापालिकेसाठी निलेश राणेंवर मोठी जबाबदारी|VIDEO

Nilesh Rane responsibility in BMC Polls: मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून आक्रमक रणनिती आखली जात असून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंवर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंबईत आता राणेंची तोफ धडाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निलेश राणेंवर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

ठाकरेंच्या पारंपरिक प्रभाव असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिंदेगटाकडून आक्रमक रणनीती आखली जात असून त्यात निलेश राणेंची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः वरळी, लालबाग, माहीम, शिवडी आणि दादर या भागांमध्ये निलेश राणेंची तोफ धडाडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

या भागांमध्ये आक्रमक प्रचार, सभांचा धडाका आणि थेट स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत ठाकरे गटाला आव्हान देण्याची जबाबदारी निलेश राणेंकडे देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. नगरपरिषद निडणुकीमध्ये निलेश राणे यांनी मालवणमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवल्याने आता एकनाथ शिंदे यांनी आता ही जबाबदारी सोपवल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com