Surabhi Jayashree Jagdish
मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल येतात. हे पिंपल फोडले की त्या ठिकाणी डाग किंवा खड्डा पडण्याची समस्या दिसून येते. त्वचेच्या थराला इजा झाल्यामुळे हे खड्डे तयार होतात आणि लगेच भरून येत नाहीत.
परंतु नियमित काळजी आणि काही घरगुती उपाय केल्यास हे खड्डे निघून जाऊन गुळगुळीत त्वचा मिळू शकते. हे उपाय नेमके काय आहेत ते पाहूयात.
कोरफड कापून त्यातील जेल थेट खड्ड्यांवर लावा. कोरफड त्वचेला दुरुस्ती करतं आणि नवीन पेशी तयार होण्यास मदत करतं.
एक चमचा मधात काही थेंब लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण खड्ड्यांवर लावल्यास १०–१५ मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचा उजळते आणि डाग हलके होण्यास मदत होते.
चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून जाड पेस्ट करा. ही पेस्ट आठवड्यातून २–३ वेळा चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील खड्डे कमी दिसू लागतात.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडून त्यातील तेल पिंपलमुळे आलेल्या खड्ड्यांवर लावा. हे तेल त्वचेची लवचिकता वाढवण्यास मदत करतं.
दह्यात चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटे ठेवून नंतर धुवा. दही त्वचा मऊ करते आणि खड्ड्यांभोवतीची त्वचा उजळवते.
थोडं बदाम तेल घेऊन खड्ड्यांच्या भागावर मसाज करा. तेल त्वचेला पोषण देतं आणि कोलेजन निर्मितीस मदत करतं. आठवड्यातून किमान ३–४ वेळा हा उपाय करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.