दिवसें दिवस कुत्रा चावण्याच्या घटना सतत वाढत चालल्या आहेत. कुत्रा चावल्याने बऱ्याच लोकांचा बळी गेला आहे, ही बाब अस्वस्थ करणारी आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना कानावर आली महिनाभऱ्यापूर्वी एका मुलाला कुत्रा चावला होता, त्याने इंजेक्शन न घेतल्याने त्याला रेबीज झाले आणि त्यामुळे त्याचे वेदनादायक मृत्यू झाला.
रेबीजबद्दल लोकांना जागरुकता आणण्यासाठी आणि लोकांना या घातक आजारापासून वाचवण्याच्या उद्देशाने दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जगभरात रेबीज दिन साजरा (Celebrate) केला जातो. हा दिवस फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांची पुण्यतिथी आहे, ज्यांनी 1885 मध्ये रेबीजची पहिली लस विकसित केली.
कुत्रा चावल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तसेच काय करावे आणि काय करू नये हे या प्रकरणावरून समजून घेतले पाहिजे. डॉ. गौरव जैन, वरिष्ठ सल्लागार, यांच्या अंतर्गत औषध, धरमशीला नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, दिल्ली यांच्याकडून जाणून घेऊयात.
कुत्रा चावल्यानंतर सर्वप्रथम काय करावे?
डॉक्टर गौरव जैन यांनी सांगितले की, जेव्हा कुत्रा चावतो, तेव्हा सर्वप्रथम कुत्रा (Dog) चावलेल्या जागेवर लगेच निर्जंतुक पट्टी बांधावी. जखमेवर चांगली मलमपट्टी करा आणि नंतर ताबडतोब जवळच्या डॉक्टरांकडे जा.
कुत्रा चावल्यानंतर प्रथमोपचार काय करावे?
जर कधी कुत्रा चावला तर रेबीज होऊ नये म्हणून प्रथमोपचार म्हणून जखम 15 मिनिटाच्या आत जखम धुवावी व नंतर मलमपट्टी बांधावी, त्यानंतर लगेच जवळच्या डॉक्टरांकडे जावे.
कुत्रा चावल्यावर घरगुती उपाय वापरायचे की नाही?
अशा स्थितीत घरगुती उपाय करणे धोकादायक ठरू शकते. कोणत्याही प्रकारच्या Quick किंवा घरगुती उपायांना बळी न पडता, लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावे.
पाळीव कुत्रा चावल्यानंतर किंवा नखांनी ओरबाडल्यानंतर देखील रेबीज होऊ शकतो?
जर तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याला लस दिली असेल तर असे होण्याची शक्यता कमी आहे. परंतु तरीही, जर तुमचा कुत्रा चावला किंवा नखांनी ओरबाडला तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि डॉक्टरांच्या सूचनेनुसार लसीकरण करा.
कुत्रा चावल्यानंतर किती तासांत इंजेक्शन द्यावे?
कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत इंजेक्शन (Injection) घेणे फार महत्वाचे आहे. मात्र, त्यासाठी साधारणपणे पाच इंजेक्शन्स लागतात. पहिल्या इंजेक्शननंतर, तिसऱ्या दिवशी दुसरे इंजेक्शन , नंतर सातव्या दिवशी तिसरे इंजेक्शन, त्यानंतर 14 व्या दिवशी आणि शेवटी 28 व्या दिवशी दिले जाते.
रेबीजची लक्षणे किती दिवसात दिसतात?
सुमारे एक ते तीन महिन्यांत तुम्हाला रेबीजची लक्षणे दिसू लागतात. यामध्ये शरीराच्या स्नायूंमध्ये दुखणे, ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, मानसिक संतुलन बिघडणे या लक्षणांचा समावेश होतो.
प्रत्येक कुत्रा चावल्याने रेबीज होतो का?
रेबीजची लागण झालेल्या कुत्र्याने आपल्याला चावल्यास रेबीज होऊ शकतो, परंतु आजकाल लोक आपल्या पाळीव कुत्र्यांचे लसीकरण अगोदर करून घेतात, त्यामुळे ही शक्यता कमी असते, परंतु तरीही भटक्या कुत्र्यांमध्ये अशी शक्यता जास्त असू शकते. त्यामुळे कुत्र्याला रेबीज झाला आहे की नाही हे माहीत नसल्यामुळे बेफिकीर राहू नका आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.