World Liver Day 2024 Special: 5 things you should include in Diet to detox lever Saam Tv
लाईफस्टाईल

World Liver Day 2024: लिव्हरमध्ये साचलेली घाण मुळासकट निघेल, आहारात करा या ५ पदार्थांचा समावेश

5 Food in Diet to detox liver : यकृताला डिटॉक्सिफिकेशन करणे गरजेचे आहे. आहारात काही पदार्थांचा सामना करुन यकृत डिटॉक्स केले जाऊ शकते. जाणून घेऊया त्याबद्दल

कोमल दामुद्रे

Liver Health Tips:

लिव्हर हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. सध्या फॅटी लिव्हरची समस्या जगभरात वाढताना दिसून येत आहे. यकृत अन्नाचे पचन करणे, रक्त फिल्टर करणे, व्हिटॅमिन डी, साखरेची पातळी संतुलित ठेवणे आणि अनेक आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे साठवण्याचे काम करते.

दरवर्षी १९ एप्रिलला वर्ल्ड लिव्हर डे साजरा (Celebrate) केला जातो. आपल्या यकृताविषयी आणि त्याचे आरोग्य जपण्याविषयी लोकांना जागरुक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

लिव्हरमध्ये साचलेल्या घाणांमुळे अॅलर्जी, बद्धकोष्ठता, पचन आणि थकवा अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. या समस्या दीर्घकाळ राहिल्यास हिपॅटायटीस, सिरोसिस, कावीळ आणि कर्करोग (Cancer) यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे यकृताला डिटॉक्सिफिकेशन करणे गरजेचे आहे. आहारात (Food) काही पदार्थांचा सामना करुन यकृत डिटॉक्स केले जाऊ शकते. जाणून घेऊया त्याबद्दल

1. हळद

हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन यकृताच्या पेशींची दुरुस्ती करते आणि त्यांच्यामध्ये साचलेली घाण काढून टाकण्याचे काम करते. हळदीचे सेवन यकृतामध्ये जमा झालेली चरबी काढून टाकण्यास मदत करते.

2. हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात. जे रक्तातील घाण शोषून घेण्याचे काम करतात. यकृतातील घाण साफ करण्यासाठी पालक, मोहरी, कार्ले आणि कोथिंबीरचा आहारात समावेश करा.

3. लिंबूवर्गीय फळे

लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. जे केवळ रोगप्रतिकार शक्ती वाढवत नाही तर शरीराला डिटॉक्सिफाइड करण्यास मदत करते. यासाठी आहारात द्राक्षे, संत्री, लिंबू या फळांचा समावेश करा.

4. लसूण

लसणामध्ये सल्फर असते. जे यकृतातील घाण साफ करते. याशिवाय यात सेलेनियम देखील आहे. जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.

5. ग्रीन टी

यकृत स्वच्छ करण्यासाठी ग्रीन टी खूप फायदेशीर आहे. त्यात वनस्पती आधारित अँटी ऑक्सिडंट्स असतात. याचे सेवन केल्यास यकृतामध्ये साठलेली अतिरिक्त चरबी कमी करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT