Hypertension Day 2024 Google
लाईफस्टाईल

World Hypertension Day: जगभरात जागतिक उच्च रक्तदाब दिन का साजरा करतात? जाणून घ्या

World Hypertension Day History: उच्च रक्तदाबाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक रक्तदाब दिवस साजरा केला जातो. १७ मे रोजी हा दिवस साजरा केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याची बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. उच्च दाबामुळे हृदयविकाराच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे काळजी घ्यायला हवी. उच्च रक्तदाबाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक रक्तदाब दिवस साजरा केला जातो. १७ मे रोजी हा दिवस साजरा केला जातो.

उच्च रक्तदाबाविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम, रॅली आणि स्पर्धांद्वारे जागरुकता वाढवली जाते.

जागतिक उच्च रक्तदाब दिन २०२४ थीम

यंदाची 'जागतिक उच्च रक्तदाब दिन २०२४' ची 'तुमचा रक्तदाब अचूक मोजा, ते नियंत्रित करा आणि दीर्घकाळ जगा', अशी थीम आहे. याद्वारे रक्तदाब वेळच्या वेळी मोजला पाहिजे. त्याबाबत सामान्य लोकांना जागरुक केले पाहिजे, आजारापासून संरक्षण कसे करावे. याबाबत माहिती देण्याचे काम केले जात आहे.

जागितक हायपरटेन्शन लीग (WHL)द्वारे जागतिक उच्च रक्तदाब दिवस सुरु करण्यात आला. १४ मे २००५ रोजी सर्वात पहिला जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा केला जात आहे.

जगातील लाखो लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू होतात. मीडिया रिपोर्टनुसार, दरवर्षी ७.५ दक्षलक्ष लोकांच्या मृत्यूला उच्च रक्तदाब कारणीभूत आहे. त्यामुळे या आजाराबाबत लोकांच्या मनात जनजागृती करणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाबावर वेळीच उपाय केल्याने आपण जीव वाचवू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सांगलीत एक कोटी 11 लाखांच्या बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त, पाच जणांना अटक

Rukmini Vasanth: 'कांतारा' चित्रपटात आपल्या दमदार अभियनाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री कोण?

Laughing Benefits: हसल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात माहितीये का?

Maharashtra Politics : शरद पवारांना धक्का, विश्वासू सहकाऱ्यांने केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुंग्या किती वेळ झोपतात माहितीये का? वेळ ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

SCROLL FOR NEXT