World Heart Day 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

World Heart Day 2023 : जागतिक हृदय दिनानिमित्त मेडीकवर हॉस्पिटलने दिले ३० हजाराहून अधिक लोकांना सीपीआरचे प्रशिक्षण

Heart Care : संशोधनात असे दिसून आले आहे की सडन कार्डियाक अरेस्ट नंतर तात्काळ सीपीआर आणि एईडी तंत्र वापरल्यास जगण्याची क्षमता 10% ते 70% पर्यंत वाढते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

CPR Training :

भारतात दरवर्षी सुमारे 5-6 लाख लोक सडन कार्डीयाक डेथ (SCD) मुळे जीव गमावतात. 50 वर्षांखालील व्यक्तींचे प्रमाण यामध्ये सर्वाधीक आहे. बदलेल्या जीवनशैलीमुळे हृदयावर आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजाराने पिडीत नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. द लॅन्सेट हे जगातील प्रसिध्द असे वैद्यकीय जर्नल असून यामध्ये देखील याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

डॉ कुमार नारायणन, वरिष्ठ सल्लागार कार्डिओलॉजिस्ट आणि इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट मेडिकवर हॉस्पिटल्स, हैदराबाद आणि एससीडी (सडन कार्डिअ‍ॅक डेथ) क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच या संघाचे उप सभापती म्हणून कार्यरत आहेत. ते सांगतात की, सडन कार्डियाक अरेस्ट (SCA) पासून वाचणाऱ्यांचे प्रमाण हे 10% पेक्षा कमी आहे.

हा आयोग कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) आणि सार्वजनिक प्रवेश ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (AED) चा वापर वाढवण्यासाठी जनजागृती करत आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की सडन कार्डियाक अरेस्ट नंतर तात्काळ सीपीआर आणि एईडी तंत्र वापरल्यास जगण्याची क्षमता 10% ते 70% पर्यंत वाढते.

ही आपत्कालीन गरज असून, मेडिकवर हॉस्पिटल्स सक्रियपणे एक देशव्यापी सीपीआर प्रशिक्षण मोहीम राबवित आहे. हार्ट सेव्हर्स: निरोगी विश्वासाठी सीपीआर प्रशिक्षण हा एक स्तुत्य उपक्रम राबविला जात असून त्याचा उद्देश हा सीपीआर सारखे जीवन-रक्षक कौशल्याचा वापर करुन नागरिकांना साक्षर करणे आहे.

या मोहिमेच्या उपक्रमाबाबत डॉ.शरथ रेड्डी (कार्यकारी संचालक, मेडिकवर हॉस्पिटल्स) सांगतात की, सीपीआर ही एक आपत्कालीन जीवन रक्षक प्रक्रिया आहे. जेव्हा एखाद्याच्या हृदयाची धडधड थांबते तेव्हा त्या स्थितीला कार्डियाक अरेस्ट म्हणून ओळखले जाते. सीपीआरचे उद्दिष्ट छातीवर योग्यरित्या दाब देत शरीराच्या महत्त्वपूर्ण अवयवांमध्ये रक्ताभिसरण सुरळीत करणे आहे. वेळीच सीपीआर मिळाल्यास हृदयविकाराच्या झटक्यानंतर (Heart Attack) जगण्याची शक्यता 5 ते 10 पटीने सुधारू शकते.

हार्ट सेव्हर्स: निरोगी विश्वासाठी सीपीआर प्रशिक्षण या संकल्पने अंतर्गत, मेडिकवर हॉस्पिटलच्या वतीने विनामूल्य सीपीआर प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. या देशव्यापी शिबीरात तज्ज्ञांकडून सीपीआर कौशल्य शिकण्याची संधी मिळेल.

एससीआर सारख्या परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी काही मिनिटांत प्रभावी सीपीआर प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन वैद्यकीय पथकाला काही मिनिटांत एससीएच्या ठिकाणी पोहोचणे जवळजवळ अशक्य आहे. सामान्य लोकांना एससीए ओळखण्यासाठी आणि आपत्कालीन सीपीआर तंत्र शिकवून आणि प्रशिक्षित करून, आपत्कालीन सेवा पोहोचेपर्यंत किंवा रुग्णालयात दाखल केले जाईपर्यंत पीडित व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. ज्या देशांमध्ये अशा प्रकारचे तंत्र शिकविले जाते त्याठिकाणी जगण्याचे प्रमाण अधिक आहे असेही डॉ कुमार यांनी स्पष्ट केले.

मेडिकवर हॉस्पिटल्सच्या देशव्यापी मोहिमेत प्रमाणित तज्ञांकडून स्वयंसेवकांना सीपीआर प्रशिक्षण घेता येणार आहे. आमच्या मार्गदर्शनाखाली भारतातील 30,000 हून अधिक लोकांना प्रशिक्षित करण्याची अपेक्षा डॉ. सतीश कुमार कैलासम यांनी व्यक्त केली आहे हे एक प्रशिक्षक आणि मेडिकोव्हर ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे (Hospital) मेडिकल डायरेक्टर आहेत.

डॉ अनिल कृष्ण जी,(मेडिकवर हॉस्पिटल्स, इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक) सांगतात की, सीपीआर (कार्डिओ-पल्मोनरी रिसुसिटेशन) चे मूल्य समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये आम्ही सर्वच स्तरातील नागरिकांना शिक्षित करण्याच्या प्रयत्न करत आहोत. अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने कोणाचाही मृत्यू होऊ नये याकरिता आम्ही ही मोहीम राबवित आहोत. सर्वात आधी आम्ही मेडीकवर नेटवर्कच्या एकुण 25 रुग्णालयांमध्ये ही मोहीम राबवणार आहोत.

या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी स्वयंसेवकांसाठी एक लिंक तयार करण्यात आली आहे त्याद्वारे नोंदणी करता येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे. आमच्या सर्व केंद्रांमधील ईएमएस, कार्डिओलॉजी आणि क्रिटिकल केअर विभाग यांचा यामध्ये सहभाग असणार आहे. एससीए बद्दल जागरुकता वाढविण्यासाठी आणि जास्तीत जास्त नागरिकांचा यात सहभाग व्हावा याकरिता आमची टीम याठिकाणी कार्यरत आहे. या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही सामाजिक संस्थांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.

अधिक माहिती आणि नोंदणीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या:

https://www.medicoverhospitals.in/cpr/

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

SCROLL FOR NEXT