आज 26 सप्टेंबर या दिवशी दरवर्षी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो. पर्यावरणाच्या चांगल्या आरोग्याचा मानवी आरोग्यावरही थेट परिणाम कसा होतो हे स्पष्ट करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो.
या दिवशी, IFEH, त्यांच्या सदस्य देशांसह, पर्यावरणाचे महत्त्व (Importance) आणि त्याची काळजी याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. वर्तमान आणि भावी पिढ्यांच्या हितासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो.
हा दिवस 'जागतिक पर्यावरण आरोग्य (Health) दिन' म्हणून साजरा करण्याची सुरुवात 26 सप्टेंबर 2011 रोजी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थने केली. पर्यावरणाचे आरोग्य, त्याचे महत्त्व आणि त्यासंबंधीच्या समस्यांबाबत लोकांना जागरूक करणे हे साजरा करण्याच्यामागचे उद्देश होते.
पर्यावरणाचे आरोग्य म्हणजे काय?
हवा, पाणी, माती इत्यादी आपल्या आजूबाजूला जे काही आहे, ते सर्व आपल्या शारीरिक, मानसिक (Mental) आणि सामाजिक आरोग्यावर परिणाम करतात. जर हे निरोगी असतील तर आपले आरोग्य देखील चांगले राहील आणि जर ते दूषित झाले तर त्याचा थेट परिणाम आपल्या सर्वांच्या जीवनावर होतो.
आपल्यापैकी बहुतेकजण त्याबद्दल विचार करत नाहीत, चर्चा करत नाहीत किंवा पर्यावरण निरोगी ठेवण्याची जबाबदारी घेत नाहीत. पर्यावरणाचे बिघडलेले आरोग्य केवळ आपल्या जीवनासाठीच नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ते अधिक चांगले करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या विषयावर जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन सुरू करण्यात आला.
थीम
दरवर्षी हा दिवस नवीन थीमसह साजरा केला जातो. 2023 मध्ये, हा दिवस प्रत्येकाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक दिवशी उभे राहणे या थीमसह साजरा केला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.