World Health Day : निरोगी राहण्यासाठी कसे जपाल किडनीचे आरोग्य ? जाणून घ्या डॉक्टरांकडून

Kidney Health : जेव्हा आपली किडनी नीट काम करत नाही, तेव्हा अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.
World Health Day
World Health DaySaam Tv
Published On

World Health Day 2023 : आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयंवापैकी किडनी एक आहे. आपले संपूर्ण आरोग्य हे किडनीच्या आरोग्यावर अवलंबून असते. एकूण आरोग्यामध्ये किडनी महत्त्वाची भूमिका बजावते.

जेव्हा आपली किडनी (Kidney) नीट काम करत नाही, तेव्हा अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. किडनी आपल्या शरीराला डिटॉक्सिफाई करते पण या व्यतिरिक्त किडनी अनेक प्रकारे आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच निरोगी (Healthy) राहण्यासाठी किडनीचे निरोगी असणे गरजेचे आहे.

World Health Day
Kidney Health Care : लिंबूपासून बनवलेल्या 'या' ड्रिंक्स ठरतील किडनीसाठी अत्यंत फायदेशीर!

परंतु अनेक लोक किडनीशी संबंधित अनेक समस्यांशी झुंजत आहेत जसे- किडनी स्टोन, किडनी सूज, किडनी निकामी होणे, किडनी ब्लॉकेज इ. त्यांच्यावर वेळीच उपचार न केल्यास भविष्यात किडनी निकामी होण्याबरोबरच अनेक गंभीर आजारही (Disease) होऊ शकतात.

किडनी सर्वांगीण आरोग्यामध्ये कशी भूमिका बजावते, या विषयावर अधिक जाणून घेऊया.

1. मूत्रपिंड निरोगी असणे महत्वाचे आहे का?

किडनी ही शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकते. शरीरातील रसायनांचे संतुलन राखण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. ते इतर अनेक कार्यांमध्ये भूमिका बजावते जसे की, शरीरातील मीठ, पोटॅशियम आणि ऍसिडचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम किडनी करते. मूत्रपिंड शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करणारे संप्रेरक तयार करते, जसे की लाल रक्तपेशींचे उत्पादन उत्तेजित करण्यासाठी हार्मोन्स तयार करण्यात ती भूमिका बजावते. त्याचप्रमाणे, मूत्रपिंड देखील रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि कॅल्शियमचे चयापचय करण्यासाठी हार्मोन्स तयार करते.

World Health Day
World Health Day 2023 : तुम्ही दररोज आरोग्याची काळजी कशी घेता ? या 5 गोष्टी अवश्य जाणून घ्या

शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यास मदत होते. हे व्हिटॅमिन डीचे सर्वात सक्रिय स्वरूप तयार करण्यास मदत करते, जे मजबूत, निरोगी हाडांसाठी आवश्यक आहे. हे लाल रक्तपेशी वाढवण्यातही भूमिका बजावते.

2. किडनी खराब झाल्यावर कोणत्या समस्या उद्भवतात ?

  • सतत किडनीचे आरोग्य खराब झाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होतो

  • शरीरात पाणी साचू शकते, त्यामुळे हात-पायांवर सूज येऊ शकते. यामुळे फुफ्फुसात द्रव जमा होऊ शकतो.

  • अनियंत्रित रक्तदाब

  • रक्तातील पोटॅशियमची उच्च पातळी किंवा अचानक वाढ दिसू शकते.

  • शरीरात अशक्तपणा दिसून येतो

  • प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते

  • लैंगिक समस्या असू शकतात

  • हृदयविकाराचा धोका वाढवतो

  • हाडे कमकुवत होणे

  • मध्यवर्ती मज्जासंस्थेवरही त्याचा परिणाम होतो

  • गर्भधारणा समस्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com