Sakshi Sunil Jadhav
वेगळे साहस आणि धाडस करायला आपल्या राशीला कायमच आवडते. आज विविध प्रकारची वाहने हाताळायला आवडतील. जवळच्या प्रवासातून वेगळे सुख शोधाल.
खाण्यापिण्यावर आपल्या राशीला विशेष प्रेम आहे. आज कुटुंबीयांच्या बरोबर बाहेर जेवायला जायचा बेत आखाल. सुंदरशी मेजवानी आज तुमच्या नशिबात आहे. धनशी निगडित उलाढाली सुद्धा होतील.
एखाद्या गोष्टीचा ध्यास आणि ध्येय घेऊन आज पेटून उठाल. आपल्यात उपजत असणारी बोलण्याची कला याला वक्तृत्वाचे एक सुंदरसे वलय प्राप्त होईल. सकारात्मक गोष्टींनी भारावलेला दिवस असेल.
मनातील गोष्टी कुणाशी तरी बोलाव्यात. आपली भावना कुठेतरी व्यक्त करावी असे आज वाटेल. पण योग्य त्या व्यक्तीची निवड करणे आज गरजेचे आहे.
मित्र-मैत्रिणींशी वागताना आज विशेष काळजी घ्या. आपल्या राशीला इगो जरा जास्तच आहे. आपल्यामुळे आज कोणी दुखावले जाणार नाही ना यावर लक्ष द्या.
बुधाची जरी रास असली आपली तरीसुद्धा कष्ट आणि मेहनतीला आपण मागे हटत नाही. तुमच्या आयुष्याची वेगळी जडणघडण होईल. समाजात मान मिळेल.
आयुष्यामध्ये ध्येयाने पेटून उठणारी आपली रास आहे. कामाच्या बाबतीत आज सचोटीने व्यवहार होतील आणि व्यवसायात एक वेगळा पराक्रम आज तुमच्याकडून घडेल.
खरे तर मंगळाची जरी रास असली तरी भावनिकता आपल्या राशीमध्ये आहेच. काही वेळेला सहकार्याच्या नादात एका एकट्यानेच अनेक कामे करावी लागतात.
अग्नी तत्वाची आपली असणारी रास कायमच कामे घेण्यासाठी पुढाकार घेणारी आहे. कामाला न थकता घोडदौड चालूच असते.
शनि प्रधान असणारी आपली रास चिकट आणि चिवट आहे. त्यामुळे हाती घेतलेले काम पूर्ण झाल्याशिवाय आपण थांबत नाही. नोकरीच्या ठिकाणी हिच आज तुमची उजवी बाजू ठरेल. तब्येत मात्र जपा.
संशोधनात्मक गोष्टी करण्यासाठी आपली रास कायमच आघाडीवर असते. उत्तम अशी बौद्धिक रास आहे नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. शिव उपासना करावी.
आपल्या राशीला देव भोळी रास असे म्हटलं आहे. घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्यामध्ये आज सहभागी व्हायला तुम्हाला आवडेल. दिवस चांगला आहे.