Sakshi Sunil Jadhav
जेवणाची रंगत वाढवण्यासाठी तोंडी लावायला काहीतरी झणझणीत हवं असेल तर एक झणझणीत आणि खास मारवाड स्टाईल लसूण चटणी रेसिपी बनवू शकता.
लसूण पाकळ्या, लाल मिरच्या, आमचूर पावडर, जिरं, तेल, मीठ इ.
सर्वप्रथम लसूणाच्या पाकळ्या टरफलासह मंद आचेवर भाजून घ्या. ही मारवाड स्टाईल लसूण चटणी फक्त ५ मिनिटांत तयार होते.
त्याच कढईत सुक्या लाल मिरच्या आणि जिरे हलके भाजून घ्या. लाल मिरची, जिरे आणि लसूण यांचा सुगंध जेवणाची चव वाढवतो.
सगळे पदार्थ थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घाला. आमचूर पावडरमुळे चटणीला खास आंबट झणझणीत चव मिळते.
त्यात मीठ, तेल आणि आमचूर पावडर टाका. भाजताना लसूण जळू नये, नाहीतर चव कडू लागते.
आता मिक्सरमध्ये बारीक वाटून चटणी तयार करा. तयार चटणी एअरटाइट डब्यात ठेवा.
ही चटणी १० ते १५ दिवस टिकते. हवं असल्यास वरून फोडणी देऊन सर्व्ह करा.
डाळ बट्टी, भाकरी किंवा पराठ्यासोबत ही चटणी अप्रतिम लागते. आमचूर पावडरऐवजी थोडं लिंबूरसही वापरू शकता.