Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे फक्त महान अर्थशास्त्री नव्हते, तर ते जीवनाचे गूढ समजून सांगणारे महान तत्त्वज्ञ आणि नीती निर्माता होते. त्यांच्या चाणक्यनीतीत अनेक अमूल्य विचार सांगितले आहेत.
चाणक्यांच्या मते, असे काही ठिकाण सांगितले आहेत जिथे जाणं माणसाच्या प्रतिष्ठेला कलंक लावू शकतं. जाणून घ्या, ती कोणती ठिकाणं आहेत.
चाणक्य म्हणतात, ज्या ठिकाणी माणसाला सन्मान मिळत नाही, अशा ठिकाणावर कधीच पाऊल ठेवू नये. सन्मान हा माणसाला महत्वाचा आहे.
ज्ञान हे माणसाचं खरं धन आहे. जिथे ज्ञानाचं महत्व समजलं जात नाही, अशा ठिकाणी राहणं म्हणजे नर्कासारखं जीवन असते.
ज्या ठिकाणी रोजगाराच्या संधी नाहीत तिथे माणसाचं जगणं अवघड होतं. पैशाविना सन्मान आणि आत्मविश्वास दोन्ही टिकत नाहीत.
संस्कार हे माणसाचं खरे अलंकार आहेत. ज्या घरात मोठ्यांचा सन्मान, स्त्रियांचा आदर आणि लहानांवर प्रेम नाही तिथे राहणं चुकीचंच आहे.
वाईट संगतीत माणूस आपली बुद्धी आणि इज्जत दोन्ही गमावतो. जिथे लोक खोटं, फसवणूक, व्यसन आणि अन्याय करतात अशा ठिकाणांपासून दूर राहणं उत्तम आहे.
चाणक्य सांगतात की, ज्या ठिकाणी सत्य, धर्म आणि नैतिकतेचं पालन होत नाही त्या ठिकाणी माणसाने पाऊल ठेवू नये.
ज्या समाजात स्त्रिया व वडीलधारी व्यक्ती यांचा आदर केला जात नाही. तिथे सुख आणि शांती टिकत नाही. त्या ठिकाणांपासून दूर राहणं हेच योग्य आहे.