Sakshi Sunil Jadhav
पर्यटन हा अनेकांचा आवडीचा विषय असतो. पण महागाई, तिकिटांचे दर आणि राहण्याच्या खर्चामुळे अनेक जण परदेशात फिरण्याचं स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत.
आता काळजी करण्याची गरज नाही! काही देश असे आहेत जिथे भारतीय रुपया तगडा आहे आणि तुम्ही कमी खर्चात परदेशभ्रमंतीचा आनंद घेऊ शकता.
भारतातील वाढत्या महागाईमुळे पर्यटन महाग झाले आहे, पण काही देश असे आहेत. तिथे १ रुपया जास्त महाग असल्याने खर्च खूपच कमी होतो.
भारताच्या १०० रुपयांना नेपाळमध्ये १६० रुपये मिळतात. त्यामुळे नेपाळमध्ये फिरणं बजेटमध्ये झाले आहे. या ठिकाणी फिरण्याचा प्लान परफेक्ट आहे.
तुम्हाला इथे १ भारतीय रुपया म्हणजे ५० कंबोडियन रियाल इतके खर्च करतात येतील. येथील संस्कृती, मंदिरे आणि ऐतिहासिक ठिकाणे आकर्षणाचे केंद्र आहेत.
इथे १ भारतीय रुपयाची किंमत तब्बल ३०० व्हिएतनामी डाँग एवढी आहे. त्यामुळे तुम्ही खूप कमी खर्चात हा सुंदर देश फिरू शकता.
व्हिएतनाममध्ये राहणीमानाचा खर्च भारतापेक्षा खूपच कमी आहे. हॉटेल्स, स्ट्रीट फूड आणि ट्रान्सपोर्ट सर्व परवडणारे आहेत.
व्हिएतनाममध्ये पर्वत, समुद्रकिनारे, मंदिरे आणि ऐतिहासिक शहरं आहेत. जे प्रत्येक पर्यटकासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत.
फक्त दोन ५०० रुपयांच्या नोटांमध्ये तुम्ही व्हिएतनामसारखा सुंदर देश फिरू शकता. एवढं स्वस्त प्रवास कुठेच नाही. इथलं नैसर्गिक सौंदर्य आणि अनोखी संस्कृती फोटोग्राफीसाठी अप्रतिम पार्श्वभूमी देते.