Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

Drone Controversy Heats Up Ahead of BMC Polls: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात आल्याची चर्चा रंगलीय.. कारण ठाकरेंच्या मातोश्रीभोवती ड्रोन घिरट्या घालताना आढळून आलंय.. त्यावरुन कसं राजकारण तापलंय.
Drone spotted hovering near Uddhav Thackeray’s ‘Matoshree’ residence in Mumbai, triggering a major political controversy.
Drone spotted hovering near Uddhav Thackeray’s ‘Matoshree’ residence in Mumbai, triggering a major political controversy.Saam Tv
Published On

हे घिरट्या घालणारं ड्रोन आहे मुंबईतील हाय सेक्युरिटी झोनमधील उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या परिसरातील.. याच भिरभिरणाऱ्या ड्रोनमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय... तर ठाकरेंच्या नेत्यांनी मातोश्रीबाहेर घिरट्या घालणारं ड्रोन उद्धव ठाकरेंवर पाळत ठेवण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप केलाय.

मात्र मातोश्रीबाहेर ड्रोन उडवल्या प्रकरणामुळे वातावरण तापल्यानंतर अखेर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय.BKC आणि खेरवाडी परिसरात MMRDA ने पोलिसांची परवानगी घेऊनच ड्रोन सर्व्हेक्षण केल्याचा दावा करण्यात आलाय.. तर हे ड्रोन याच सर्व्हेक्षणाचा भाग आहे.. ड्रोन कुणावरही पाळत ठेवण्यासाठी नव्हतं.

मात्र पोलिसांच्या स्पष्टीकरणानं ठाकरे गटाचं समाधान झालंच नाही.. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी MMRDA वर प्रश्नांची सरबत्ती केलीय..

ड्रोनवरुन बवाल, ठाकरेंचे सवाल

आमच्या निवासस्थानात डोकावणारा ड्रोन पकडला

माध्यमांना समजल्यावर MMRDA ने सर्व्हेक्षणाचं कारण सांगितलं

असं कोणतं सर्व्हेक्षण तुम्हाला लोकांच्या घरात डोकावण्याची आणि पकडल्यावर उडून जाण्याची परवानगी देते?

संपूर्ण BKC मध्ये MMRDA केवळ आमच्याच घरावर पाळत ठेवतेय का?

पोलिसांनी परवानगी दिली होती तर रहिवाशांना का कळवलं नाही?

खरंतर गृह विभागाकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना Z+ सुरक्षा आहे.. रश्मी ठाकरेंना Y+ एस्कॉर्ट, आदित्य ठाकरेंना Z तर तेजस ठाकरेंना वाय सुरक्षा देण्यात आलीय. मात्र ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तोंडावर मातोश्रीवरील ड्रोनच्या घिरट्या राजकीय वातावरण तापवणार हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com