दरवर्षी 22 एप्रिल रोजी 'आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन' साजरा केला जातो. या दिवशी पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले जाते. वसुंधरा दिनानिमित्त पृथ्वीवरील वातावरणातील बदल, ग्लोबल वार्मिंग, प्रदूषण, या समस्या कशा टाळता येतील, यासारख्या आव्हानांवर चर्चा केली जाते.
१९७० पासून जगभरातील १९० हून अधिक देश दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा करत आहेत. जर तुम्हालाही तुमचे घर इको-फ्रेंडली (Eco Friendly) हवी असेल आणि वाढत्या विज बिलपासून सुटका हवी असेल तर या पद्धती फॉलो करा.
1. एलईडी लाईट
बाजारात एलईडी लाईट्सचे अनेक पर्याय आहेत. हे तुम्ही तुमच्या घरात वापरु शकता. यामुळे घर आकर्षित दिसेल पण वीज बिलही कमी होईल. पर्यावरणावर (Environment) नकारात्मक परिणामही होणार नाही.
2. रसायन
घरात साफसफाई करताना रासायनिक उत्पादनांचा वापर करु नका. यामुळे त्वचा आणि केसांवर परिणाम होऊ शकतो. तसेच इतर अनेक आजार होण्याची शक्यता आहे. बाथरुम आणि फरशी साफ करण्यासाठी केमिकल वापर असाल तर वेळीच थांबा. त्यासाठी बायो एन्झाईम्सचा वापर करा.
3. फॅब्रिक्स
बेडशीट, सोफा कव्हर आणि पडदे इत्यादींची निवड करताना त्याच्या फॅब्रिकची विशेष काळजी घ्या. त्यात कुठेही प्लास्टिकचा वापर होणार नाही हे देखील पाहा. यामुळे पर्यावरण सुधारण्यात मदत होईल.
4. कंपोस्ट खत तयार करा
स्वयंपाकघरात दररोज भाजीपाल्याची साले, उरलेले अन्न इत्यादी कचरा आपण घराबाहेर टाकतो. अशावेळी जर तुम्ही कंपोस्ट खत बनवायला सुरुवात केली तर बागेतील झाडे हिरवीगार होतील. तसेच अनेक रोगांचा प्रसार टाळता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.