कोमल दामुद्रे
मेंदू आपल्या संपूर्ण शरीराचे कार्य योग्य प्रकारे करते.
वाढत्या वयाबरोबर किंवा कमी वयात स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी अक्रोड आणि बदाम खूप फायदेशीर मानले जातात. त्यासाठी आहारात याचा समावेश करा.
बेरीमध्ये भरपूर अँटीऑक्सिंडंट असतात. याचे सेवन करणे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य सुधारते.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ६ आढळते. जे सेरोटोनिनला प्रोत्साहन देते. यामुळे मूड आनंदी राहतो.
डार्क चॉकलेटमध्ये व्हिटॅमिन बी६, मॅग्रेशियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात. जे मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त ठरतात.
सॅल्मन, ट्यूना यासारख्या माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. जे मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे.