World breastfeeding week, Newborn baby health, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

World breastfeeding week : बाळाला दूध पाजणाऱ्या आईला अशक्तपणाला आल्यास , बाळाला होऊ शकतात हे आजार

बाळाच्या आईला अशक्तपणा आल्यास काय कराल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : अशक्तपणा हा शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यानंतर होणारा आजार आहे .यामध्ये रक्तातील लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी होत जाते .तसेच संपूर्ण शरीरात रक्त नसांपर्यंत पोहोचत नाही .

हे देखील पहा -

स्तनपान करताना काही महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता जाणवते व त्यामुळे अशक्तपणा येतो . जागतिक स्तनपान सप्ताह हा १ ते ८ऑगस्ट या कालावधीत साजरा केला जातो . सुमारे ५० ते ६० टक्के अशक्तपणाच्या समस्या लोहाच्या कमतरतेमुळे होतात व काही समस्या या जीवनसत्त्व ब-१२, जीवनसत्त्व ए व जीवनसत्त्व ब - ६ आणि फॉलिक अॅसिडच्या कमरतेमुळे होतात. काही दाहक व जुनाट आजाराचे कारण देखील असू शकते.

अशक्तपणाचा परिणाम हा नवजात बाळावर होतो. आईच्या दुधात कमी प्रमाणात लोह आढळते. जे पहिल्या चार महिन्यांत बाळाच्या लोहाती गरज भागवू शकते. सहा महिन्यानंतर बाळाच्या (Baby) लोहाची गरज आईच्या दूधाने (Milk) पूर्ण होऊ शकत नाही.

स्तनपानादरम्यान, निरोगी बाळाला चार महिन्यांनंतर आईच्या दुधातून पुरेसे लोह मिळत नाही. म्हणून, यावेळी, बाळ आधीच साठवलेले लोह वापरते जे त्याच्या शरीराला ६ महिन्यांपर्यंत लोह पुरवण्यास मदत करते.

लोह नवजात मुलाच्या शारीरिक आणि मानसिक विकासास मदत करते आणि सहज थकवा देखील प्रतिबंधित करते. नवजात मुलामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा होऊ शकतो ज्यामुळे बाळाच्या वाढीवर व विकासावार परिणाम होतो.

अकाली जन्मलेल्या बाळांना किंवा ३७ आठवड्यांपूर्वी जन्मलेल्यांना पहिल्या महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत दररोज 2 मिग्रॅ/किलो या दराने लोह पूरक आहार आईने करायला हवा.

निरोगी आणि अकाली जन्मलेल्या बाळांना सहा महिने स्तनपान देण्याची शिफारस केली जाते. पहिल्या वर्षी बाळाला गायीच्या दुधापासून दूर ठेवा. निरोगी बाळांना सहा महिन्यांनंतर आयर्न सप्लिमेंट्स किंवा फॉर्म्युला फीड देणे योग्य ठरू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT