Manasvi Choudhary
आवळा औषधी फळ आहे. व्हिटॅमिन सीने समृद्ध आवळा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. थंडीच्या दिवसात आवळा खाल्ला जातो. आवळ्याचे विविध पदार्थ बनवून खाल्ले जातात.
आबंट- गोड आवळा मुरंबा तुम्ही खाऊ शकता. आवळा मुरंबा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने आवळा मुरंबा बनवू शकता.
आवळा मुरंबा बनवण्यासाठी आवळा, वेलची पावडर, साखर, केशर हे साहित्य एकत्र करा. सर्वप्रथम आवळा मुरंबा बनवण्यासाठी आवळा स्वच्छ धुवून तो सुका करा.
यानंतर आवळ्याचे बारीक छोटे तुकडे करा. गॅसवर एका भांड्यात गरम पाणी करा आणि त्यामध्ये आवळा साधारण १० मिनिटे उकळून घ्या.
यानंतर एका प्लेटमध्ये हे आवळा काढा. यानंतर गॅसवर दुसऱ्या बाजूला एका भांड्यात साखर आणि पाणी उकळवून घ्या. यानंतर या मिश्रणात आवळा पुन्हा शिजवून घ्या यानंतर काही मिनिटांनी आवळा थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढा.
एका काचेच्या बरणीमध्ये हा आवळा ४ते ५ तास भरून ठेवा नंतर त्यात वेलची पावडर आणि केशर घाला. अशाप्रकारे आबंट- गोड आवळा मुरंबा घरच्या घरी तयार होईल.