

मोहोपे स्टेशनचे नाव बदलून अधिकृतपणे पोयंजे करण्यात आलंय
महाराष्ट्र शासन, गृह मंत्रालय आणि सर्व्हे ऑफ इंडियाच्या मंजुरीनंतर हा निर्णय लागू करण्यात आलाय
नवीन नाव मराठी, हिंदी आणि रोमन या तीनही लिपींमध्ये असणार
मध्य रेल्वेच्या आणखी एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात आले आहेत. राज्य सरकारने कोकण भागातील मोहोपे स्टेशनचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या स्टेशनचे नाव 'पोयंजे' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार, सर्व रेल्वे नोंदी, फलक, घोषणा, प्रवासी माहिती प्रणालींमध्ये नवीन नावानुसार आवश्यक बदल करण्यात येतील. तसेच रेल्वेच्या वेबसाइट अॅपवर स्टेशनचे नाव नवीन दिसणार आहे. मोहोपे स्टेशन हे पनवेल-मडगांव मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात येतं.
'मोहोपे स्टेशन'चे नाव बदलून 'पोयंजे' करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. या स्टेशनवर प्रवाशांची मोठी संख्या असते. स्थानिकांच्या मागणीनंतर महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयाला नाव बदलण्याचा प्रस्ताव पाठवला होता. गृह मंत्रालय आणि सर्व्हे ऑफ इंडियाच्या मंजुरीनंतर 'पोयंजे'नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवीन नाव तीन लिपींमध्ये असणार आहे. मराठीमध्ये पोयंजे, हिंदीमध्ये पोयंजे आणि इंग्रजीमध्ये 'POYANJE' असे नाव करण्यात आलं आहे. प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी, अशी विनंती आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचना आणि भारताचे सर्वेयर जनरल यांच्या पत्रानुसार, स्थानकाचे नवीन नाव कसे वाचावे आणि लिहावे?
• देवनागरी लिपी (मराठी): पोयंजे
• देवनागरी लिपी (हिंदी): पोयंजे
• रोमन लिपी (इंग्रजी): POYANJE
तत्पूर्वी , उस्मानाबादचे नाव धाराशिव (2023 ), अहमदनगरचे नाव अहिल्यानगर (2024), चिखली रोडचे नाव बुलढाणा (2024), कसारा स्टेशनचे नाव कसारा घाट (2024), एलफिन्स्टन रोडचे नाव प्रभादेवी (2018), कर्जत स्टेशनचे कर्जत जंक्शन (2023) असे नाव बदलण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.