World Breastfeeding Day 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

World Breastfeeding Day 2023: स्तनपानामुळे महिलांना हृदयविकाराचा धोका कमी? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

कोमल दामुद्रे

Breastfeeding Benefits For Mother: स्तनपानामुळे आई आणि बाळ दोघांनाही अनेक आरोग्यविषयक फायदे मिळतात, परंतु अलीकडेच तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की स्तनपानामुळे महिलांना हृदयविकाराचा धोका कमी होतो.

ज्या माता आपल्या बाळाला स्तनपान करतात त्यांना भविष्यात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याची शक्यता स्तनपान न करणार्‍यांच्या तुलनेत कमी असते. आईने आपल्या बाळाला स्तनपान केले पाहिजे जेणेकरुन बाळाचा सर्वांगीण विकास आणि वाढ होण्यास मदत होईल.

स्तनपान हा त्या बाळाला (Baby) सर्व प्रकारचे पोषण देते आणि आई (Mother) व बाळाचे नाते आणि दृढ करण्यास मदत करते. आईच्या दुधाची रचना ही बाळाच्या पोषणासंबंधी गरजा पूर्ण करण्यासाठी केली जाते, ज्यामध्ये सर्व आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि अॅटीबॉडिज असतात जे त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देतात. हे केवळ संसर्ग आणि आजारांपासून बाळाचे संरक्षण करण्यास मदत करत नाही तर भविष्यात दमा, ऍलर्जी, लठ्ठपणा, मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग यांसारख्या दीर्घकालीन परिस्थितींचा देखील धोका देखील कमी करते. एवढेच नाही तर स्तनपानामुळे मातांना हृदयाच्या (Heart) समस्यांना दूर ठेवता येते.

डॉ कौशल छत्रपती, (वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट) सांगतात की, स्तनपानाचे बरेच फायदे आहेत. यामुळे बाळांच्या बुद्धिमतेच्या क्षमतेला चालना मिळते. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती होते. त्यांना दमा, एक्झिमा आदींचा त्रास होण्याची शक्यता कमी असते. त्यांना अतिसार आणि कुपोषणाचा त्रास होण्याची शक्यता कमी असते आणि सर्वसाधारणपणे ते निरोगी असतात.

मुलाला कमीत कमी सहा महिने स्तनपान दिल्यास आईला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकारांपासून दूर राहता येते. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार ज्या मातांनी स्तनपान केले आहे त्यांच्यामध्ये हायपरटेन्शनचे,मधुमेह, लठ्ठपणा आणि मेटॅबोलिक सिंड्रोमचा भविष्यातील धोका इतर महिलांच्या तुलनेने कमी होतो. तसेच कोरोनरी आर्टरी डिसीज हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. तर, ज्या स्त्रिया बाळाच्या जन्मानंतर ६ ते १२ महिने स्तनपान करतात त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका १७ टक्क्यांनी कमी, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका १४ टक्क्यांनी कमी आणि पक्षाघाताचा धोका १२ टक्क्यांनी कमी होतो.

डॉ. कौशल पुढे सांगतात की, स्तनपान ही एक थकवा आणणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे स्त्रीच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात कॅलरी खर्च होतात. यामुळे गर्भधारणेदरम्यान वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे नैसर्गिकरित्या मधुमेहाचा धोका कमी होतो, चयापचय सिंड्रोम आणि अनेक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांपासून दूर राहता येते.

ऑक्सिटोसिन हे एक प्रेम वाढवणारे संप्रेरक(love hormone) असून यामुळे स्तनपान करणाऱ्या माता आणि त्यांचे मूल यांच्यामध्ये एक उच्चपातळीचे भावनिक संबंध निर्माण करण्यास मदत करतात. हे गर्भाशयाच्या वाढीस आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. अशा प्रकारे स्तनपान केल्याने आईच्या शरीरात साखरेचे संतुलन राखण्यात मदत होते आणि गर्भधारणेचे घातक परिणाम उलटतात.

स्तनपानामुळे निरोगी आहाराचे सेवन, नियमित व्यायाम, चांगली झोप घेता येते आणि निरोगी जीवनशैली जगणे शक्य होते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा धोका कमी होतो. बर्‍याच अभ्यासांनी हे सिध्द केले आहे की 12 महिने स्तनपान केल्यावर आरोग्यविषयक अनेक चांगले फायदे दिसू लागतात आणि हे फायदे पुढे वाढत जातात. तुम्ही जे काही स्तनपान करता, त्याचा नेहमीच सकारात्मक परिणाम होतो.

स्तनपान, नवजात बालकांचे पोषण करण्याचा एक नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे. आई आणि बाळ दोघांसाठीही त्याचे असंख्य फायदे आहेत. अलीकडील करण्यात आलेल्या अभ्यासांतून स्तनपान हा मातांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि अगदी स्ट्रोकचा धोका कमी करण्‍यामध्‍ये फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे.

स्तनपान केवळ बाळाच्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर आईचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांपासून संरक्षण देखील देते. ज्या स्त्रिया आपल्या बाळाला स्तनपान करतात त्यांना पुढील आयुष्यात हृदयविकार होण्याचा धोका कमी असतो. हा संरक्षणात्मक परिणाम अनेक घटकांमुळे होऊ शकतो.

स्तनपान आईला गर्भधारणेदरम्यानचे जास्त वजन कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका वाढतो. स्तनपान ऑक्सिटोसिन च्या उत्सर्जनास उत्तेजन देते, एक संप्रेरक जो तणावाची पातळी कमी करते, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास उत्तम राखण्यास मदत करते. स्तनपानाबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. आई आणि बाळ दोघांसाठीही स्तनपान हे दीर्घकाळासाठी फायदेशीर असल्याचे डॉ. माधुरी मेहेंदळे(स्त्रीरोगतज्ज्ञ, झायनोवा शाल्बी हॉस्पिटल) यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT