Puja Utensils Cleaning Tips : तांब्या-पितळेची भांडी काळीकुट्ट पडलीये? अशी बनवा घरच्या घरी पिंताबरी; नव्यासारखे चमकतील...

Homemade Pitambari : किचनमध्ये असलेल्या काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही बाजाराप्रमाणे पितांबरी पावडर सहज बनवू शकता.
Puja Utensils Cleaning Tips
Puja Utensils Cleaning TipsSaam Tv
Published On

Cleaning Hacks : श्रावण महिना सुरु झाला की, अनेक सण सुरु होतात. या काळात आपण घरात ठेवलेली पूजेची भांडी काढतो. पण कितीही काळजी घेतली तरी ही भांडी एकतर काळीकुट्ट पडतात किंवा यांच्यावर धूळ साचते.

पितळे, तांब्याची किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यांची काळजी घेणे खरेतर कठीण होते. अशावेळी कितीही महागडी पिंताबरी किंवा डिटर्जन्टचा वापर केला तरीही भांडी (Utensils) काही चमकत नाही. स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमची भांडी स्वच्छ करण्यासाठी महिला बाजारातून (Market) पितांबरी पावडर खरेदी करतात. पण तुम्हाला माहित आहे का की किचनमध्ये असलेल्या काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही बाजाराप्रमाणे पितांबरी पावडर सहज बनवू शकता.

Puja Utensils Cleaning Tips
Belapur Station : जागा एकच पण रेल्वे स्टेशन दोन, नावही त्यांचे वेगळे

1. कशी बनवाल घरच्या घरी पिंताबरी

  • 1/4 कप- टार्टर (सायट्रिक ऍसिड)

  • 1/4 कप- मीठ

  • 1/4 कप- गव्हाचे पीठ

  • 1/4 कप - डिटर्जंट पावडर

  • 2-3 थेंब फूड कलर

Puja Utensils Cleaning Tips
How To Get Rid of Rain Insects : घरातील फरशी पुसताना पाण्यात मिसळा हे 3 पदार्थ, पावसाळ्यात माश्या व किड्यांपासून राहाल दूर

2. पद्धत-

घरच्या घरी (Homemade) पिंताबरी बनवण्यासाठी सर्व प्रथम एका भांड्यात टार्टर, मीठ, गव्हाचे पीठ, डिटर्जंट पावडर आणि फूड कलर असे सर्व साहित्य एकत्र करून घ्या. मिक्सरमध्ये हे चांगल्याप्रकारे वाटून घ्या, त्यानंतर ही पावडर एअर टाइट डब्यात ठेवा.

3. कशी वापराल?

पितळेची किंवा तांब्याची भांडी चमकवण्यासाठी स्क्रबरमध्ये तयार पितांबरी घेऊन भांडी घासा. काही मिनिटांत तुमचे भांडी नव्यासारखी होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com