How To Get Rid of Rain Insects : घरातील फरशी पुसताना पाण्यात मिसळा हे 3 पदार्थ, पावसाळ्यात माश्या व किड्यांपासून राहाल दूर

How To Get Rid of Rain Insects : घरातील फरशी पुसताना पाण्यात मिसळा हे 3 पदार्थ, पावसाळ्यात माश्या व किड्यांपासून राहाल दूर
How To Get Rid of Rain Insects
How To Get Rid of Rain InsectsSaam Tv
Published On

How To Prevent Monsoon Insects : पावसाळ्यात सगळ्या जास्त त्रास होतो तो घरात भुणभुणाऱ्या माश्यांचा व कीटकांचा. याकाळात घर कितीही स्वच्छ ठेवले तरी त्या सतत घरात येतात. हे कीटक आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि अनेक रोगांचे कारण बनू शकतात.

तसेच हे घरातील इतर वेगवेगळ्या भागात जमा होतात ज्यामुळे आपली चिडचिड होते. बरेचदा हे कीटक व माश्या पळवण्यासाठी आपल्याला स्वच्छतेची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, जर आपण फरशी पुसताना पाण्यात काही गोष्टी मिसळल्या तर दिवसभर या त्रासातून आपली सुटका होऊ शकते. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

How To Get Rid of Rain Insects
Silver Item Cleaning Hacks : लिंबू-मीठ, केचपपासून चमकवा चांदीची भांडी, गेलेली चकाकी येईल परत...

1. पाण्यात व्हिनेगर मिसळा -

बादलीत पाणी (Water) भरा आणि त्यात थोडे व्हिनेगर घालून चांगले मिसळा. आता या पाण्याने घराचे सर्व भाग नीट पुसून टाका. असे केल्याने व्हिनेगरचा वास घरभर पसरेल आणि कीटक घरामध्ये (Home) येणार नाहीत. याशिवाय माश्यांपासूनही सुटका होईल

2. फिनाइल वापरा -

घराच्या साफसफाईसाठी फिनाइलचा वापर केला जातो. मॉपिंग करताना, जर काही फिनाइलचे काही थेंब पाण्याने भरलेल्या बादलीत मिसळले तर ते चांगले स्वच्छता एजंट म्हणून काम करेल. यामुळे घरातील सर्व जंतू नष्ट होतील आणि पावसाळी (Monsoon) कीटकांपासूनही सुटका होईल. फिनाइलला उग्र वास येतो त्यामुळे माश्याही घरात राहत नाहीत.

How To Get Rid of Rain Insects
Astro Tips : कासवाची अंगठी करते मालामाल! बोटात घालण्यापूर्वी नियम ही जाणून घ्या

3. मीठ, बेकिंग सोड्याने साफसफाई करा –

पावसाळ्यात तुम्हाला घरापासून कीटक दूर ठेवायचे असतील, तर तुम्ही मॉपिंग करताना घरगुती क्लिनिंग सोल्यूशन तयार करू शकता. यासाठी तुम्हाला बेकिंग सोडा, मीठ आणि व्हिनेगर लागेल. सर्व प्रथम, एका बादलीत पाणी भरा आणि त्यात 2-3 चमचे बेकिंग सोडा, 2 चमचे मीठ आणि 2-3 झाकण व्हिनेगर घाला. या सर्व गोष्टी मिसळा आणि नंतर स्वयंपाकघरसह सर्व ठिकाणे पुसून टाका. यामुळे पावसाळी किडे तुमच्या घरात येणार नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com