World Asthama Day 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

World Asthama Day 2024: दमा असलेल्या रुग्णांनी व्यायाम करताना ही काळजी घेणे आवश्यक; अन्यथा वाढतील अडचणी

Exercise For Asthama Patients: दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक अस्थमा दिन (World Asthama Day)साजरा केला जातो. जगभरातील लोकांना अस्थमा या आजाराबाबत जागरुक करणे हा यामागचा मुख्य उद्देष आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक अस्थमा दिन (World Asthama Day)साजरा केला जातो. जगभरातील लोकांना अस्थमा या आजाराबाबत जागरुक करणे हा यामागचा मुख्य उद्देष आहे. अस्थमाच्या रुग्णांना श्वसनाचा खूप जास्त त्रास होतो. अस्थमाच्या रुग्णांच्या श्वसनमार्गाला सूज येते, कफचा त्रास होतो. त्यामुळे अनेक आजार होतात. अस्थमाच्या रुग्णांनी निरोगी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात काळजी घ्यायला हवी. खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यायला हवे. अस्थमाच्या रुग्णांनी काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम करणे फायदेशीर ठरते. आज आम्ही तुम्हाला याचबद्दल माहिती देणार आहोत.

पोहणे

पोहणे हा एक उत्तम व्यायाम आहे. अस्थमाच्या रुग्णांनी पोहण्याचा सराव केला पाहिजे. त्यामुळे श्वसाचे स्नायू मजबूत होतात. तसेच श्वसनाची क्षमतादेखील वाढते. पोहल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते तसेच तुम्ही तंदुरुस्त राहतात.

मोकळ्या हवेत फिरणे

ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे त्या व्यक्तींनी दररोज सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जावे. मोकळ्या हवेत फिरायला गेल्याने श्वसनाच्या समस्या कमी होतात. मोकळ्या हवेत फिरायला गेल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल.

योग

अस्थमाच्या रुग्णांनी रोज योगासने केली पाहिजेत. योगासनामध्ये त्यांनी श्वसनांचे योगा करायला हवे. यामुळे तुमच्या श्वसनाची आणि फुफ्पुसाची कार्यक्षमता वाढेल. तसेच शरीरातील रक्ताभिरसरण क्षमता वाढते. यामुळे अनेक आजारांपासून तुम्हाला आराम मिळेल.

अस्थमाच्या रुग्णांनी व्यायाम करताना ही काळजी घ्यावी

श्वास नाकाद्वारे घ्या

अस्थमाच्या रुग्णांनी व्यायाम करताना काळजी घ्यायला हवी. त्यांनी नेहमी नाकातूनच श्वास घ्यायला हवा. जर त्यांनी तोंडाने श्वास घेतला तर त्यांना अनेक समस्या होऊ शकतात.

आजारपणात व्यायाम करणे टाळावे

अस्थमाच्या रुग्णांनी आजारपणात शक्यतो व्यायाम करणे टाळा. जर तुम्ही आजारी असताना व्यायाम केला तर तुम्हाला श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

इनहेलर नेहमी जवळ ठेवा

ज्या व्यक्तींना अस्थमाचा त्रास होतो. त्यांनी इनहेलर नेहमी त्यांच्यासोबत ठेवावे. जर तुम्हाला कधी श्वसनाचा त्रास झाला तर तुम्ही इनहेलरचा वापर करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Herbal Tea : सकाळी उठल्यावर प्या 'ही' हर्बल टी, पोटाच्या समस्यांपासून होईल सुटका

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये एकाच ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या जेरबंद

Nashik politics : नाशिकमध्ये ४ मंत्री, पण ध्वजारोहणाचा मान जळगावच्या महाजनांना, पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार?

Shocking: DM सोबतच्या ऑनलाईन मिटिंगमध्ये अचानक प्ले झाला पॉर्न VIDEO, पाहताच महिला अधिकारी पळून गेल्या

Dengue : गडचिरोलीत डेंग्यूचा कहर; महिलेसह दोन जणांचा मृत्यू, मुलचेरा तालुक्यात ६६ रुग्ण

SCROLL FOR NEXT