ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निरोगी आरोग्यासाठी दररोज व्यायाम करणे अत्यंत आवश्यक असते.
मात्र आपल्यापैंकी असे अनेकजण आहेत त्यांना व्यायाम करण्याचा खूप कंटाळा येतो.
मात्र खाली दिलेल्या स्मार्ट टिप्सच्या मदतीने तुम्हाला व्यायाम करण्याचा कंटाळा येणार नाही.
व्यायाम करण्याचा कंटाळा येत असल्यास तुम्ही सुरुवातीस १५ मिनिटे व्यायाम करावा,त्यानंतक हळू हळू कालावधी वाढवा.
सुरुवातीस स्ट्रेचिंगसारखा पद्धतीने सुरुवात करावी.
व्यायाम करताना कंटाळा येतोय असे वाटतंय तेव्हा तुम्ही घरातील अन्य सदस्यास तुमच्या सोबत व्यायाम करण्यास सांगू शकता.
व्यायामाची व्यवस्थित कपडे परिधान करुन तुम्ही व्यायाम केला तर तुम्हाला दररोज व्यायाम करण्याची इच्छा होते.
व्यायाम करताना कंटाळा येत असल्यास संगीत ऐकत व्यायाम तुम्ही करु शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.