varicose veins google
लाईफस्टाईल

Varicose Veins: ९ ते ५ ऑफिसमध्ये बसून काम करणं धोक्याचं, वेळीच जाणून घ्या नुकसान आणि शरीरावर होणारे गंभीर परिणाम

Blood Circulation: दररोज तासनतास बसून किंवा उभं राहून काम करणं शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. तज्ज्ञ सांगतात की, यामुळे शिरांवर दबाव वाढून व्हेरिकोज व्हेन्सचा धोका वाढतो.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करणं किंवा सतत उभं राहून काम करणं यामुळे शरीराला अनेक गंभीर आणि धोकादायक समस्यांना सामोरं जावं लागतं. तरी तज्ज्ञांच्या मते या सवयींमुळे आपल्या शिरांवर आणि पायांवर गंभीर परिणाम करू शकतात.

व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. सुमित कपाडिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं की, दररोज ८ तासांपेक्षा जास्त वेळ बसून काम केल्याने रक्ताभिसरणाचा वेग मंदावतो आणि शिरांवर दबाव वाढतो. यामुळे हळूहळू व्हेरिकोज व्हेन्स (varicose veins) किंवा रक्ताच्या गाठी होण्याचा धोका वाढतो.

अधिक वेळ बसून राहिल्याने काय होऊ शकतं?

पाय सुजणे

दीर्घकाळ बसल्याने रक्ताभिसरण कमी होतं, त्यामुळे पायात सूज आणि जडपणा जाणवतो.

रक्ताच्या गाठीची समस्या

रक्त नीट वाहत नसल्याने गाठी (clots) तयार होऊ शकतात, ज्या धोकादायक असतात.

व्हेरिकोज व्हेन्स

शिरांची भिंत कमकुवत झाल्यास त्या फुगतात, दुखतात आणि दिसायलाही वाईट दिसतात.

५ सोप्या टिप्स

१. दर ३० ते ६० मिनिटांनी उभं राहा आणि स्ट्रेचिंग करा.

२. प्रत्येक तासाला काही मिनिटे चालण्याची सवय लावा.

३. बसून काम करताना पाय हलवा, अँकल पंप करा.

४. पुरेसं पाणी प्या, यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.

५. कॉम्प्रेशन सॉक्स वापरा, जर शिरांचे त्रास आधीपासून असतील.

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला पायात सूज, वेदना किंवा शिरा बाहेर आलेल्या दिसत असतील, तर दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर व्हॅस्क्युलर सर्जनचा सल्ला घ्या.

टीप

ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. कोणत्याही आरोग्य समस्येसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात येणार? आमदार महेश लांडगे यांचं महापालिका आयुक्तांना पत्र

बनावट इंस्टाग्राम अकाऊंटचा पर्दाफाश; मैत्रिणींचेच अश्लील फोटो केले व्हायरल, महिला वकिलाचा धक्कादायक कारनामा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी...

Hair Care : तुम्हाला ही सुंदर केस हवेत? मग केसांना लावा कडुलिंबाचे तेल, जाणून घ्या फायदे

ठाण्यात महायुतीचं ठरलं! शिंदे गटाच्या महापौरपदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळोलकर आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT