Work During Pregnancy Saam Tv
लाईफस्टाईल

Work During Pregnancy : प्रेग्नेंसीमध्ये ऑफिसला जाताय? कशी घ्याल आरोग्याची काळजी, वाचा सविस्तर

Women Care Tips : वर्किंग महिलांसाठी गरोदरपणाचा काळ हा खूप आव्हानात्मक असतो. या काळात कामासोबत स्वत:ची काळजी घेणे देखील जास्त गरजेचे असते.

कोमल दामुद्रे

Working while pregnant tips

वर्किंग महिलांसाठी गरोदरपणाचा काळ हा खूप आव्हानात्मक असतो. या काळात कामासोबत स्वत:ची काळजी घेणे देखील जास्त गरजेचे असते. काम आणि स्वत:ची काळजी या दोन्ही गोष्टींचा समतोल राखावा लागतो.

गर्भधारणेदरम्यान आरोग्याबाबत कोणतीही निष्काळजीपणा तुमच्या होणाऱ्या बाळावर परिणाम करु शकतात. त्यामुळे या काळात आरोग्याला अधिक प्राधान्य द्या. या काळात महिलांमध्ये अनेक बदल होत असतात. गरोदरपणात (Pregnancy) अधिक प्रमाणात भूक लागते. त्यामुळे तुम्हाला सतत काही ना काही खावे लागते. जास्त वेळ उपाशी राहिल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कशी घ्याल आरोग्याची (Health) काळजी

1. दिवसाची सुरुवात

गरोदरपणात नेहमी रोजच्या पेक्षा थोड लवकर उठण्याचा प्रयत्न करा. घाईगडबडीत काम केल्यास तुम्हाला थकवा येऊ शकतो. थोडाफार प्रमाणात व्यायाम करा. बाहेर जाणे शक्य नसेल तर घरातल्या घरात फिरा. यामुळे शरीराला फायदा होईल.

2. निरोगी आहार

या काळात शरीराला सकस आणि संतुलित आहाराची (Food) गरज असते. त्यामुळे नाश्ता आणि दुपारच्या जेवणात निरोगी आहार असायला हवा. यामध्ये तुम्ही फळे, कडधान्ये, सुकामेवा याचा समावेश करु शकता.

3. द्रव पदार्थ

आहारात द्रव पदार्थांचा समावेश करा. दूध, ज्यूस, सूप, ताक आणि लस्सी असायला हवे. तसेच दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्या. तसेच ग्रीन टी देखील पिऊ शकता. चहा-कॉफी जास्त पिऊ नका.

4. ब्रेक घ्या

ऑफिसमध्ये कामाचा ताण अधिक वाटू लागला की, ब्रेक घ्या. हे आरोग्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू नका. जेवल्यानंतर बाहेर चाला. यामुळे पाठ, कंबर, हात तसेच डोळे आणि मेंदूला आराम मिळतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

Priyadarshini Indalkar: चुनरी तेरी कमाल कर गई.... प्रियदर्शनी इंदुलकरचा हटके लूक

कसारा घाटात कामगारांचा बिऱ्हाड मोर्चा, मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे मोर्चा वळवणार

Nia Sharma: नागिन फेम निया शर्माने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT