Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट! महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचा 'वेगळा' निर्णय

Shiv Sena UBT Signals Solo Fight in Upcoming Pune Civic Polls: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाने सर्व ४१ प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू केली.
Uddhav thackeray
Uddhav thackeray News Saam tv
Published On
Summary
  • पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठं पाऊल

  • शहरातील सर्व जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

  • पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. उर्वरित जागांसाठी २० डिसेंबर रोजी निवडणूक पार पडेल. सध्या अनेक भागात महानगरपालिका निवडणुकांसाठी नेत्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे. अनेकांना महापालिकेचे वेध लागले आहे. अशातच पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. पुण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. शहरातील सर्व जागांवर त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे.

एकाबाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसेला घेऊन महापालिका निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू आहे. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पुण्यात मोठं उचलण्यात आलं आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा सर्व ४१ प्रभागात उमेदवाराचे अर्ज घेणार असल्याची माहिती आज शहर प्रमुख संजय मोरे यांनी दिली. त्यांनी एकंदरीत एकला चलो रेचा नारा दिला असल्याची चर्चा आहे.

Uddhav thackeray
१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओतील तरूण रस्त्यावर? लोकांनी त्याला काठ्यांनी मारलं; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

आघाडी किंवा युती न झाल्यास शिवसेना पुणे शहरातील सर्व ४१ प्रभागातील १६५ जागा लढणार असल्याची माहिती आज शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषदेतून दिली. पक्षाकडून उमेदवारी अर्जाची किंमत पाचशे रुपये ठेवण्यात आली आहे. तर, उमेदवारी अर्ज दाखल करताना दहा हजार रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. यावेळी उमेदवारांचे शिक्षण त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य, पक्षाच्या आंदोलनातील सहभाग आणि जनसंपर्क याबाबत विचारणा केली जाईल.

Uddhav thackeray
नॅशनल हायवेवर भीषण अपघात; भरधाव डंपरची बसला धडक, १० जणांचा जागीच मृत्यू, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

दरम्यान, पुण्यात मनसेसोबत युती आणि महाविकास आघाडीसाठी कोणतेही हालचाल होत नसल्याने शिवसेनेची एकट्याने लढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाने घेतलेल्या निर्णयानंतर पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com