Crime: बाप बनला हैवान! झोपलेल्या मुलीच्या गळ्यावरून ब्लेड फिरवलं, नंतर बायकोवर चाकू हल्ला; मुंबई हादरली

Mumbai Crime: मुंबईमध्ये एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलीची आणि बायकोची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने झोपलेल्या मुलीच्या गळ्यावरून ब्लेड फिरवलं तर बायकोला चाकूने भोसकलं. या हल्ल्यात दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.
Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं
Bihar CrimeSaam tv
Published On

Summary -

  • मुंबईत बापाने मुलीच्या गळ्यावरून ब्लेड फिरवत हत्या करण्याचा प्रयत्न केला

  • मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या बायकोवर आरोपीने चाकूने हल्ला केला

  • या हल्ल्यात आई आणि मुलगी दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत

  • दोन्ही जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

मुंबईमध्ये मन सुन्न करून टाकणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका व्यक्तीने आपल्या १४ वर्षांच्या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने झोपलेल्या मुलीच्या गळ्यावरून ब्लेड फिरवले. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिला वाचवण्यासाठी आलेल्या आईवर देखील आरोपीने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी आणि तिची आई गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत सोनावणे ( ३६ वर्षे) असं आरोपीचे नाव आहे. आरोपी आपल्या कुटुंबीयांसोबत मुंबईत राहतो. दारूच्या नशेमध्ये घरी येऊन आरोपीने आधी मुलीवर हल्ला केला. गाढ झोपेत असलेल्या मुलीच्या गळ्यावरून त्याने ब्लेड फिरवलं. मुलगी जोरजोरात ओरडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून तिला वाचवण्यासाठी तिची आई आली. यावेळी आरोपीने बायकोवर देखील हल्ला केला. या हल्ल्यात पीडित मुलीच्या गळ्याला टाके पडले तर तिची आई देखील जखमी झाली. दोघींवर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं
Akola Crime: भररस्त्यात रक्तरंजित थरार! प्रेमप्रकरणातून चाकूने वार करत तरुणाची हत्या; अकोला हादरले

आरोपी बेरोजगार असून त्याला दारूचे व्यसन लागले आहे. बायकोचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय त्याला होता. यावरून तो सतत तिला आणि मुलीला मारहाण करत होता. दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. दारूच्या नशेत असताना बुधवारी सकाळी आरोपीने झोपेत असलेल्या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या गळ्यावर त्याने ब्लेड फिरवले. त्यानंतर मुलीच्या बचावासाठी आलेल्या आईच्या पोटात चाकू भोसकला.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं
Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

याप्रकरणी आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी आणि त्याच्या बायकोचा घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळेच तो चिंतेत होता. तर जखमी झालेल्या त्याच्या बायको आणि मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं
Nashik Crime Bhushan Londhe: उत्तर प्रदेशातही 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'; कुख्यात गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com