Woodpecker Bird Saam TV
लाईफस्टाईल

Woodpecker Bird: झाडावर चोच आपटून बनवतो घर; तरी सुतार पक्ष्याला कोणतीच दुखापत का होत नाही?

Woodpecker Bird Beak: जेव्हा सुतार पक्षी एकचा चोच आपटतो तेव्हा त्याच्या मेंदूवर १४०० ग्रॅम एवढा दाब पडतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Woodpecker Bird Nest:

सुतार पक्षी झाडाच्या खोडावर चोच आपटून घर बनवतो. झाडाचं खोड इतकं कठीण असतं की माणसाला हे खोड तोडण्यासाठी कुऱ्हाडीसारख्या हत्याराचा वापर करावा लागतो. अशात सुतार पक्षी इतका लहान असूनही तो झाडाच्या खोडामध्येच आपल्या चोचेने खड्डा बनवतो आणि त्यात राहतो. आता असं करताना त्याला कोणतीच दुखापत होत नाही का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्यामुळे या बातमीतून याबाबत माहिती जाणून घेऊ. (Latest Marathi News

सुतार पक्षी झाडाच्या खोडावर घर बनवताना एकाच ठिकाणी एकाच वेळी २० वेळा चोच मारतो. सुतार पक्षाची चोच फार कठीण आणि तिक्ष्ण असते. जेव्हा सुतार पक्षी एकदा चोच आपटतो तेव्हा त्याच्या मेंदूवर १४०० ग्रॅम एवढा दाब पडतो. हा दाब इतका जास्त असतो की, आपल्या सारखी १४ माणसं या दाबामुळे दगावू शकतात.

सुतार पक्षाला कोणतं वरदान मिळालंय

सुतार पक्षाची चोच त्रिकोणी आकाराची असते. तसेच त्याची चोच ही फार लांब असते. जेव्हा सुतार पक्षी झाडावर चोच आपटतो तेव्हा संपूर्ण दाब त्याच्या डोक्यावर पसरतो. सुतार पक्षाची जीभ मेंदूच्या मागून चोचेपर्यंत आलेली असते. चोच आपटल्यावर मेंदूला इजा न होता संपूर्ण दाब डोक्यावर आणि जिभेवर येतो. त्यामुळे सुतार पक्षाला कोणतीही इजा होत नाही.

जगभरात असे अनेक पक्षी आहेत. प्रत्येक पक्षाचे वेगळे रुप आणि वेगळे महत्व आहे. सुतार पक्षी शक्यतो झाडांच्या फांद्यांवर असलेल्या किटकांचे भक्षण करतो. करड्या रंगाचे सुतार पक्षी हिवाळ्यात डोंगराळ भागांमध्ये स्थलांतर करतात. सुतार पक्षी ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, न्यू गिनी, अंटार्क्टिका आणि मादागास्कर वगळता जगभरात सर्वत्र पाहायला मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध गायिकेचं निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा

RCB vs GT IPL 2026 Final: आरसीबीसमोर गुजरातचं १५६ धावांचं आव्हान

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वारे आणि पावसाला सुरुवात

गिल झेलबाद होताच कोहलीचा जोश हाय; पाटीदारच्या अप्रतिम झेलवर विराटचं जबरदस्त सेलिब्रेशन

नोकरदारांना 'सुट्ट्यांची' लॉटरी, सिगारेट सोडा, ६ सुट्ट्या मिळवा

SCROLL FOR NEXT