ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
विजेच्या तारांना हात किंवा धक्का लागल्याने करंट लागल्याच्या घटना ऐकल्या आहेत.
परंतु विजेच्या तारांवर बसल्यावरही पक्ष्यांना करंट का लागत नाही? असं का ते जाणून घ्या
जर एखादा पक्षी तारांवर बसलेला असला तर त्याला कोणत्याही प्रकारचा विजेचा झटका लागत नाही
पक्षी जेव्हा तारांवर बसलेले असतात तेव्हा त्याचा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी संपर्क नसतो त्यामुळे त्यांना करंट लागत नाही.
कारण जो पर्यंत सर्किट पूर्ण होत नाही तोपर्यंत करंट लागत नाही. करंट लागण्यासाठी अर्थींग असणे आणि सर्किट पूर्ण होणे आवश्यक असते.
पक्षी तारांवर बसलेले असतात तेव्हा कोणत्याही प्रकारचे सर्किट पूर्ण होत नाही सोबतच कोणताही अर्थींग मिळत नाही म्हणून पक्षांना तारांवर बसलेले असल्यावर ही करंट लागत नाही.