Back Pain Problem Saam Tv
लाईफस्टाईल

Back Pain Problem : वाढत्या वयात सतावतेय पाठदुखी ? दुर्लक्ष केल्यास येऊ शकते अंपगत्व, कशी घ्याल काळजी

कोमल दामुद्रे

Common Causes of Back Pain : वाढत्या वयात आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी कंबरच दुखते तर कधी पाठ. अनेक गृहिणी वाढत्या वयात पाठदुखीकडे दुर्लक्ष करतात. उठताना बसताना त्रास होतो. अचानक हाडांमधून आवज येऊ लागतो.

सध्या वयोवृद्धांमध्ये मात्र लंबर कॅनाल स्टेनोसिस सारख्या समस्या जास्त प्रमाणात आढळून आल्या आहेत. याच्यावर वेळीच उपचार केला नाही तर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर

पुण्यातील (Pune) अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटलचे प्रसिद्ध स्पाइन सर्जन डॉ आनंद कवी सांगतात, लंबर कॅनाल स्टेनोसिस म्हणजे म्हणजे पाठीच्या कण्यातील जागा अरुंद होणे आणि त्यातून जाणारा मज्जारज्जू आणि मज्जातंतू दाबला जाणे. असे म्हटले जाते की जगभरातील 12 ते 21 टक्के वृद्ध लोकसंख्या या अपंगत्वाच्या आजाराने (Disease) ग्रासले आहे आणि दिवसेंदिवस ही आकडेवारी वाढत चालली आहे. वयाच्या पन्नासीपासून लक्षणे (Symptoms) दिसू लागतात आणि वयोमानानुसार ती वाढत जातात.

1. लंबर कॅनाल स्टेनोसिस म्हणजे काय?

पाठीचा कण्याची मूळरचना ही एखादया कॅनल किंवा नळीसारखी असते, ज्यात मज्जातंतू सुरक्षित राहून मेंदूचे संकेत संपूर्ण शरीरात पोहोचवतात. पाठीचा कणा हा मणक्यांचा हाडांच्या मालिकेद्वारे बनलेला असतो. या मालिकेचा प्रत्येक भाग हा दोन मणके आणि त्यामधील धक्का शोषक चकती (डिस्क) ने तयार झालेला आहे . जीर्णत्वामुळे ही चकती उसवते ( स्लीप डिस्क ) व त्याच बरोबर दोन हाडांमधील अंतर कमी होत जाते. यामुळे पाठीच्या कण्याच्या आतील जागा अरुंद होते आणि मज्जातंतूवर सूज येते. परिणामी मेंदूकडून होणा-या संकेतांचा ( सिग्नल्स) प्रवाह विस्कळीत होतो.

2. लक्षणे कोणती ?

  • पाय बधीर होणे किंवा पायांना मुंग्या येणे

  • तळव्यांची जळजळ होणे

  • पोटऱ्या तसेच तळवे जड वाटणे. पोटरीवर गोळा येणे

  • पायात गोळे आल्याने रात्रीच्या वेळी झोपमोड होणे

  • पायांमध्ये सुई टोचल्यासारखे वाटणे

  • पाठदुखी, कंबरदुखी सतावणे

  • चालताना किंवा उभे असताना पायांमध्ये वेदना जाणवणे किंवा पेटके येणे

  • पुढे वाकल्यावर किंवा विश्रांती घेतल्यास वेदना कमी होतात

  • पायात अशक्तपणा येणे

  • शरीराचा समतोल राखण्यात समस्या उद्भवणे

  • सतत लघवी येणे किंवा ती थांबवण्यास अडचण येणे

  • नसांवर अचानक आणि तीव्र दाब आल्यामुळे पक्षाघातासारखी समस्या येऊ शकते.

3. उपचार

1. रुग्णाची योग्य तपासणी करुन एमआरआय स्कॅन केला जातो . तपासणींच्या वेळी कण्यात कुठल्या दोन मणक्यात जागा खूप कमी झाली आहे व मज्जातंतू वरील दबावाचे प्रमाण हे निश्चित केले जाते. सुरुवातीच्या टप्प्यात, वेदना कमी करण्यासाठी, पाठीच्या मज्जातंतूंची जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी आणि मज्जातंतूंचे कार्य सुधारण्यासाठी विशिष्ट औषधांद्वारे उपचार केले जातात.

2. निदानानुसार योग्य शारीरिक मुद्रा, आदर्श वजन आणि जीवनशैलीत बदल करण्याबाबत सल्ला दिला जातो. वेदना आणि लक्षणे कमी करण्यासाठी व्यायाम तसेच फिजिओथेरपी करण्यास सांगितले जाते.

3. मध्यम, तीव्र वेदना मणक्यातील विशिष्ट ठिकाणी इंजेक्शन्सद्वारे व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात ज्यामुळे मज्जातंतूंची सूज कमी होते आणि वेदना देखील कमी होते.

4. तीव्र ते अति तीव्र दबाव असल्यास शस्त्रिक्रयेद्वारे मेरुदंडाचे हाड तासून कण्याचा आतील जागा वाढवून मज्जातंतूंवरील दबाव कमी केला जातो आणि वेदनादायक भागाची हालचाल थांबिवण्याकिरता काहींमध्ये मेटल इम्प्लांट्ससह दोन मणक्यांची जोडणी करावी लागते.

4. आधुनिक पद्धत:

वाढत्या वयामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय, फुफ्फुस आणि मूत्रपिंडाच्या समस्या आणि लठ्ठपणा यासारख्या इतर समस्या देखील येतात, ज्यामुळे मोठ्या शस्त्रक्रिया आणि भूल देणे कठीण होते. तसेच हाडांच्या ठिसूळतेमुळे एकापेक्षा जास्त ठिकाणी दबाव असल्यास पारंपरिक शस्त्रक्रिया करणे अवघड असते. या अडचणींवर मात करण्यासाठी, मणक्याची शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ( इंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी ) आधुनिक पद्धतीने केली जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

Health Tips: टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? त्या आधी हे वाचा...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच समोर, एक शब्द अन् कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT