Monsoon Stomach Problems : पावसाळ्यात अपचनाचा त्रास सतावतो? पोट सतत फुगते ? हे ड्रिंक प्या, मिळेल आराम

Stomach Pain : अनेक संसर्गजन्य आजारासोबतच पोटाच्या समस्यांना देखील सामोरे जावे लागते.
Monsoon Stomach Problems
Monsoon Stomach Problems Saam Tv
Published On

Monsoon Bloating Tips : पावसाळा म्हटलं की, अनेक आजार डोके वर काढतात. अनेक संसर्गजन्य आजारासोबतच पोटाच्या समस्यांना देखील सामोरे जावे लागते. गरमागरम भजीवर ताव मारण्याऐवजी गॅस आणि पोट फुगण्याची समस्या आपल्याला मसालेदार पदार्थ खाण्यापासून थांबवते

तुम्हालाही गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या असल्यास किंवा पोट फुगल्यामुळे आवडते पदार्थ खाण्याचा आनंद घेता येत नसेल तर आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा मदतीने तुम्हाला लगेच आराम मिळेल. जाणून घेऊया त्याबद्दल

Monsoon Stomach Problems
Monsoon Care Tips : सर्दी-तापामुळे नाक बंद झालं, श्वासही नीट घेता येत नाहीये? स्वयंपाकघरातील हे पदार्थ ठरतील फायदेशीर

1. पोटात गॅस झाल्यावर काय करावे ?

पोटाच्या (Stomach) सर्व समस्यांनावर एकच उपाय आहे तो म्हणजे आहार. तुम्ही आहारात कोणते पदार्थ खातात. तसेच ते खाल्ल्यानंतर फक्त पोटात गॅस होतो की, पोट सूजते यावर लक्ष द्या.

2. पोटाला सूज कशामुळे येते ?

जेवताना बोलणे, अस्वस्थ असताना खाणे, धूम्रपान करणे, तंबाखू चघळणे, स्ट्रॉ किंवा स्पोर्ट्स बाटली वापरणे, पोटावर जास्त भार टाकणे, दीर्घ श्वास घेणे, खूप गरम किंवा थंड पेय पिणे यामुळे गॅस होऊ शकतो. ड्रिंक किंवा कडक कँडी खाणे, अधिक घट्ट कपडे घालणे आणि औषधांचा दीर्घकाळ वापर करणे यामुळे पोटावर सूज येण्याची शक्यता वाढते.

Monsoon Stomach Problems
Diabetes In Children: तज्ज्ञांनी दिली धोक्याची घंटा ! चिमुकल्यांमध्ये वाढतोय मधुमेहाचा आजार, कशी घ्याल काळजी

यासोबतच कार्बोनेटेड पेये पिणे, मसालेदार (Spices), तळलेले किंवा फॅटी पदार्थ खाणे हे देखील गॅसचे कारण असू शकते. यापासून आराम मिळवण्यासाठी कडधान्ये मदत करू शकते. आयुर्वेदानुसार पोटातील अनेक समस्यांवर ओवा हा रामबाण उपाय मानला जातो. अपचन, पोट फुगणे आणि अतिसार यासह विविध जठरोगविषयक आजारांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो.

3. गॅस आणि ब्लोटिंगसाठी ओव्याचे पाणी कसे तयार कराल?

साहित्य

  • एक कप पाणी (Water)

  • 2-3 मोठी ओव्याची पाने/ ओवा

Monsoon Stomach Problems
Kidney Health Tips : हे 7 पदार्थ खा, किडनीच्या विकारांपासून दूर राहा

कृती

  • पॅन घेऊन त्यात एक ग्लास पाणी घाला

  • पाणी उकळून त्यात ओव्याची पाने घाला

  • २-३ मिनिटे उकळून मिश्रण गाळून घ्या

याच्या सेवनाने पोट हलके होण्यास मदत होते. पोटात वाढलेली अॅसिडचे प्रमाण कमी करुन त्यातील एन्झाईम्सच्या मदतीने पचन सुधारते. तसेच आम्लपित्त कमी करते, पोट फुगणे व पोटदुखी कमी करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com