Artificial Intelligence: दररोज ChatGPT कडे किती प्रश्न विचारले जातात? ऐकून तुम्ही थक्क व्हाल

Dhanshri Shintre

आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मागणी

आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मागणी प्रचंड वाढली असून, ‘ओपनएआय’च्या ChatGPT कडे दररोज किती प्रश्न येतात, हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

प्रॉम्प्ट्स

ॲक्सिओसच्या माहितीनुसार, ChatGPT दररोज तब्बल 2.5 अब्ज प्रॉम्प्ट्स प्रोसेस करत असल्याचे समोर आले आहे.

डिजिटल जीवनाचा भाग

अमेरिकेतून दररोज सुमारे 33 कोटी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ChatGPT जागतिक डिजिटल जीवनाचा भाग ठरला आहे.

सर्च प्रश्न

तुलना केल्यास, गुगल अजूनही आघाडीवर असून दररोज 14 ते 16 अब्ज सर्च प्रश्न हाताळतो.

सर्च

गुगलवर वर्षभरात सुमारे 5 ट्रिलियन सर्च होतात, म्हणजेच दररोज 13.7 ते 16.4 अब्ज सर्च केल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.

ChatGPT चा उपयोग

लोक ChatGPT चा उपयोग फक्त 'सर्च'साठीच नाही, तर कल्पना मांडणे, कंटेंट तयार करणे, समस्यांचे समाधान आणि कोडिंगसाठी देखील करत आहेत.

ChatGPT

डिसेंबर 2024 मध्ये ‘ओपनएआय’चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी सांगितले होते की, ChatGPT वर दररोज 1 अब्ज प्रश्न विचारले जात होते.

झपाट्याने वाढणारी लोकप्रियता

म्हणजेच अवघ्या 8 महिन्यांत हा आकडा दुप्पट झाला आहे, ज्यामुळे एआयची झपाट्याने वाढणारी लोकप्रियता आणि मागणी स्पष्ट होते.

NEXT: व्हॉट्सअ‍ॅपवरील अनावश्यक फाइल्समुळे फोनची स्टोरेज भरते? 'ही' सोपी ट्रिक करा

येथे क्लिक करा