
सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी
रेल विकास निगम लिमिटेडमध्ये भरती
मॅनेजर ते डीसीएम पदांवर होणार भरती
सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती वाचा. रेल विकास निगम लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. आरवीएनएलमध्ये इलेक्ट्रिकल विभागात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुकांनी सर्वात आधी अधिसूचना वाचा त्यानंतर अर्ज करावेत.
रेल विकास निगम लिमिटेडद्वारे सिनियर डीजीएम, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आरवीएनएलमध्ये ४९ रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
आरवीएनएलमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती rvnl.org या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
पगार
सीनियर डीजीएम पदासाठी ८०,००० ते २,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. मॅनेजर पदासाठी ५०,००० ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी ४०,००० ते १४,००,००० रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी ३०,००० ते १२,००,००० रुपये पगार मिळणार आहे.
पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीई किंवा बीटेक पदवी प्राप्त केलेली असावी.काही पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी असते. त्यामुळे आधी ते चेक करा.
या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांची वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी असणार आहे. सिनियर डीजीएम पदासाठी ४८ वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे. मॅनेजर पदासाठी ४०, डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी ३५ वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये फी भरायची आहे. तर राखीव प्रवर्गासीठा अर्ज फीमध्ये सूट दिली आहे.