Diet After 30 Saam Tv
लाईफस्टाईल

Diet After 30: वयाची तिशी ओलांडल्यानंतर आहारात करा या पदार्थांचा समावेश, अनेक आजारांपासून राहाल दूर

Superfood After 30 age : वाढत्या वयानुसार प्रत्येकाला आपल्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करायला हवा. विशेषत: महिलांनी त्यांच्या आहाराकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

Women Health Tips :

वाढत्या वयानुसार प्रत्येकाला आपल्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करायला हवा. विशेषत: महिलांनी त्यांच्या आहाराकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

वयाची तिशी ओलांडल्यानंतर महिला (Women) आणि पुरुषांच्या शरीरात बरेच हार्मोनल बदल होऊ लागतात. ज्याच्या त्यांच्या आरोग्यावर (Health) चांगला आणि वाईट असा परिणाम होतो. यामुळे शरीराच्या अवयवांची काम करण्याची शक्ती देखील कमकुवत होऊ लागते.

वयाच्या तिशी ओलांडल्यानंतर आपण खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतली नाही तर अनेक आजारांना (Disease) सामोरे जावे लागते. यामुळे शरीरात प्रथिने, जीवनसत्त्वे, फायबर, कॅल्शियम आणि लोहाची कमतरता निर्माण होते. तसेच धुसर दिसणे, गुडघेदुखी, कंबरदुखी यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा जाणून घेऊया

1. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन

वाढत्या वयानुसार अधिक फायबर असणारे पदार्थांचे सेवन करायला हवे. ज्यामुळे तुमची चयापचय मजबूत होईल. तसेच रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत होईल. रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होईल.

2. हार्मोन्सचे संतुलन राखणारे पदार्थ

वाढत्या वयात हार्मोनल असंतुलनाची समस्या झपाट्याने वाढते, त्यामुळे ती नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अश्वगंधा, तुळशी, ब्रोकोली, ग्रीन-टी, सफरचंद, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, ब्लू बेरीसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा

3. लोहयुक्त पदार्थ

या वयात स्त्रियांच्या शरीरात लोहाची कमतरता कमी होते त्यामुळे थकवा जाणवतो. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो. यासाठी आहारात नियमितपणे हिरव्या भाज्या, मनुके, गूळ, बीट, गाजर यांचा समावेश करा.

4. आयोडिन असलेले पदार्थ

जर शरीरात आयोडिन आणि फोलेटचे प्रमाण कमी झाले तर गरोदरपणात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी स्त्रियांनी आहारात हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, पालक, मेथी आणि लिंबूवर्गीय फळे यांचा समावेश करावा.

5. कॅल्शियम

वाढत्या वयात हाडे कमकुवत होऊ लागतात. पाठीचा आणि मानदुखीची समस्या उद्भवू लागते. यासाठी आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. दही, चीज, बदाम, ब्रोकोली हे पदार्थ नियमित खा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT