Uterus cancer symptoms saam tv
लाईफस्टाईल

Uterus cancer symptoms: गर्भाशयाच्या कॅन्सरच्या लक्षणांकडे हमखास दुर्लक्ष करतात महिला, शरीरात 'हे' बदल दिसेल तर वेळीच व्हा सावधान

Surabhi Kocharekar

गर्भाशयाच्या कॅन्सरला गर्भाशयाच्या आतील अस्तर (एंडोमेट्रियम) पासून सुरुवात होतो. हे 90 टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये आढळून येतं. यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे यूटराइन सार्कोमा आहे. हे अत्यंत दुर्मिळपणे दिसून येतं. गर्भाशयाच्या कॅन्सरचं नेमकं कारण पूर्णपणे माहिती नसलं तरी सामान्यपणे अधिक वय हे कारण मानलं जातं.

याशिवाय जास्त वजन हे देखील एक कारण असू शकतं. जास्त वजनामुळे शरीरात जास्त प्रमाणात इस्ट्रोजन तयार होतं परिणामी गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. याशिवाय कुटुंबातील एखाद्याला गर्भाशयाचा कॅन्सर झाला असेल तर धोका वाढू शकतो. गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणं सुरुवातीच्या टप्प्यात सौम्य असतात. ही लक्षणं नेमकी काय आहेत, ते पाहूयात.

असामान्य रक्तस्राव

गर्भाशयाच्या कॅन्सरचं सर्वात सामान्य लक्षणं हे रक्तस्राव मानलं जातं. यावेळी महिलांना योनीमार्गातून रक्तस्राव होण्याचा धोका असतो. त्यामुळे मासिक पाळी सोडून जर असा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ओटीपोटात वेदना

गर्भाशयाच्या कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात ओटीपोटात वेदना जाणवू शकतात. या वेदना सतत होऊ शकतात. जर हे दुखणं दीर्घकाळ राहिल्यास किंवा मासिक पाळीच्या काळात वाढले तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

अचानक वजन कमी होणं

महिलांना जर अचानक थकवा किंवा वजन कमी झाल्यासारखं वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. जर कोणत्याही कारणाशिवाय तुमच्या वजनात घट होत असेल हे गर्भाशयाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

योनीमध्ये असामान्य डिस्चार्ज

कधीही योनीतून असामान्य स्राव होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. यामध्ये योनीतून पांढरा किंवा जाड स्त्राव दिसत असेल तर हे गर्भाशयाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. जर त्याला दुर्गंधी असेल, तर त्वरित डॉक्टरांची मदत घ्यावी.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शाब्बास रं पठ्ठ्या! Online Gamingमध्ये गमावले १५ लाख; व्हिडिओ पोस्ट करत SPकडे मागितली मदत

OBC Reservation : ओबीसी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

Karjat Picnic Spot : मित्रांसोबत करा भटकंतीचा प्लान कर्जतजवळ अनुभवा निसर्गाचा अद्भुत चमत्कार

Marathi News Live Updates : समृद्धी महामार्ग दोन तासांपासून ठप्प

Bigg Boss Marathi: हिंदी बिग बॉसमध्ये अरबाजची एन्ट्री? स्व:ताच सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT